Tomato Bajarbhav : आज दिनांक २४ डिसेंबर रोजी पुणे मोशी बाजारात टोमॅटोची ५२६ क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर २ हजार, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी २५०० रुपये असा आहे. पुणे बाजारात सकाळच्या सत्रात अवघी ७ क्विंटल टोमॅटो आवक झाली. २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
काल दिनांक २३ डिसेंबर रोजी पुणे बाजारात टोमॅटोचा १७५०, तर मोशी बाजारात २५०० रुपये असा दर होता. जुन्नर नारायणगाव बाजारात सरासरी २ हजार असा दर होता. नाशिक बाजारात हायब्रीड टोमॅटोला १३५० असा दर सोमवार दिनांक २३ रोजी मिळाला.
दरम्यान मागील आठवड्यात २२ डिसेंबर रोजी टोमॅटोचे बाजारभाव प्रति क्विंटल १४५० रुपये असे होते. टोमॅटोच्या पुणे बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. १४५० प्रती क्विंटल होत्या. किंमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत १% नी घट झाली आहे.
देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये १९ टक्केनी घट झाली आहे. नारायणगाव बाजारात मागील आठवड्यात सर्वाधिक २०८३ रुपये प्रति क्विंटल किंमती होत्या, तर सोलापूर बाजारात सर्वात कमी म्हणजेच ९०० रुपये प्रति क्विंटल असे दर होते.