Tur bajarbhav : नवीन तूर लवकरच बाजारात येणार असून शेतकऱ्यांना बाजारभावाची काळजी दिसत आहे. याचे कारण अनेक ठिकाणी तुरीच्या सरासरी बाजारभावात हमीभावापेक्षाही घसरण दिसून आली आहे.
कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार तुरीच्या साप्ताहिक किंमती दि.२२ डिसेंबर २०२४ अखेरः सरासरी रु. ८१७०/क्विंटल अशा होत्या. या आठवड्यात मात्र त्यात बरीच घसरण झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन यावर्षी सारखेच राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. खरीप हंगाम २०२४-२५ साठी किंमान आधारभूत किंमत रु. ७५५० प्रति क्विं. आहे.
दरम्यान सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी लातूरच्या बाजारात लाल तुरीची २२८१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ६ हजार ६९० रुपये, जास्तीत जास्त ७ हजार ९०० रुपये, तर सरासरी ७ हजार ७८० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाले. जालना बाजारात सरासरी ७ हजार रुपये म्हणजेच हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळाले.
दुधणी बाजारात २२७३ क्विंटल लाल तूरीची आवक झाली. सरासरी ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.