soybean bajarbhav : कांद्याच्या आगारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, असे आहेत सोयाबीन बाजारभाव…

soybean bajarbhav कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव परिसरातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचेही व्यवहार होत असून नाताळच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी येथील एका बाजारसमितीत हायब्रीड प्रकारच्या सोयाबीनला राज्यातील तुलनेने सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

पिंपळगाव बसवंत – पालखेड बाजारसमितीत सोयाबीनची सुमारे ३०० क्विंटल आवक झाली. त्यात कमीत कमी बाजारभाव ३५०१ रुपये, जास्तीत जास्त ४२७५ रुपये तर सरासरी बाजारभाव ४१७५ रुपये प्रति क्विंटल मिळाला. काल राज्यात झालेल्या सोयाबीन व्यवहारांमध्ये हा सर्वाधिक सरासरी बाजारभाव असल्याचे दिसून आले.

दरम्यान अकोला बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी ३७५० रुपये, तर सरासरी ४१३५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. हिंगोली बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी ३९८० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. लातूर जिल्ह्यातील औसा बाजारात सोयाबीनला ४११० रुपये सरासरी बाजारभाव मिळाले.

दरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही सरकारी हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू आहे. असे असले, तरी १५ टक्के आर्द्रता असणाऱ्या सोयाबीनला तुलनेने कमीच दर मिळत असून शेतकऱ्यांना सरसकट हमीभाव मिळताना दिसत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

Leave a Reply