
Maize market price : आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजारात पिवळ्या मक्याला कमीत कमी २ हजार, जास्तीत जास्त २१५० आणि सरासरी २१०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. या ठिकाणी मक्याची आवक आज ६१ क्विंटल इतकी झाली होती.
दुसरीकडे आज सकाळच्या सत्रात पुणे बाजारात लाल मका पिकाला सरासरी २५०० रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. या ठिकाणी लाल मक्याची अवघी ९ क्विंटल आवक झाली.
शुक्रवार दिनांक २७ रोजी राज्यात नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारात पिवळ्या मक्याची सर्वाधिक म्हणजेच ३ हजार ३०४ क्विंटल आवक झाली. याठिकाणी सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्याच्याजवळच असलेल्या लासलगाव बाजारात विंचूर व निफाड उपबाजार मिळून साधारण ५ हजार १०० क्विंटल मका आवक होऊन सरासरी २२५० ते २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव
दरम्यान मुंबई बाजारात मक्याला सर्वाधिक जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला. याठिकाणी २९१ क्विंटल आवक होऊन कमीत कमी २३०० रुपये, जास्तीत जास्त ४ हजार रुपये आणि सरासरी ३५०० रुपये बाजारभाव मिळाला. त्या खालोखाल शहादा बाजारात सफेद गंगा वाणाच्या मक्याला सरासरी २८०० रुपये जास्तीत जास्त २९४१ क्विंटल बाजारभाव मिळाला.