
Tur, kapus, soybean, harbhara, maka bajarbhav लवकरच रब्बी हंगामातील तूर आणि हरभरा बाजारात येणार असून शेतकऱ्यांना आपल्या तुरीला आणि हरभरा पिकाला जानेवारी ते मार्च दरम्यान काय भाव मिळतील? याची उत्सुकता आहे. तसेच ज्यांनी सोयाबीन विकला नाही त्यांनाही पुढील महिन्यात काय बाजारभाव असतील याची काळजी असून त्यासाठीची माहिती देत आहोत.
स्मार्ट प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत” शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीतील निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.
*त्याची माहिती पुढीलप्रमाणे-*
मका : रु. २००० ते २५०० प्रति क्विं.,
तूर : रु. ८००० ते १०,००० प्रति क्विं.
हरभरा : रु. ६००० ते ७५०० प्रति क्विं.
सोयाबीन : रु. ४००० ते ४८०० प्रति क्विं.,
कापूस : रु. ७५०० ते ८५०० प्रति क्विं.,
या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यकालीन किंमती विषयक अनुमान दर्शिवतो. आंतरराष्ट्रीय किंमती, हवामान, आर्थिक घटक, आणि सरकारी धोरण या घटकांमध्ये होणाऱ्या बदलामुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात, त्यामुळे वाचकांनी या अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.