Dalimb Bajarbhav : शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या डाळिंबाला बाजार समितीमध्ये कसा बाजारभाव मिळतोय ते आपण जाणून घेऊ. आज दिनांक ३० डिसेंबर, सोमवारी पुणे बाजारात आरक्ता वाणाच्या डाळिंबाची ९९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १५०० रुपये तर जास्तीत जास्त १५ हजार प्रति क्विंटल असे होते. सरासरी ८ हजार २०० रुपये बाजारभाव मिळाले.,
रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी पुणे बाजारात आरक्ता डाळिंबाला सरासरी ८ हजार ७०० रुपये बाजारभाव मिळाला होता. तर मोशी बाजारात सरासरी १० हजार बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजी नगर डाळिंबाला सरासरी ९ हजार १०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
दरम्यान मागच्या आठवड्यात शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सांगोल्यात भगवा डाळिंबाला सरासरी ११ हजार रुपये प्रति क्विंटल, सोलापूरमध्ये सरासरी ५ हजार रुपये, सांगली बाजारात सरासरी दहा हजार, नाशिक बाजारात मृदुला बाजारात सरासरी ९५०० रुपये दर प्रति क्विंटलसाठी मिळाला.