Soybean market price : शेतकरी बांधवांनो, सोयाबीनला सध्या असे आहेत बाजारभाव..

Soybean market price : शेतकरी बांधवांनो, सोयाबीनच्या भावात आजही बाजारसमित्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे हमीभाव केंद्रावर जावे तर तिथे अटी आणि शर्तींनीच शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला येतो. शिवाय सध्या अनेक हमीभाव केंद्रांवर बऱ्याच समस्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मित्रांना आता लोकल बाजारात सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय नाही.

म्हणूनच मंडळी, बऱ्याच जणांना बाजारभावाबद्दल माहिती हवी असते आणि कृषी २४ आपल्याला नियमित अचूक माहिती पोहोचवत असतो. आज आम्ही सांगणार आहोत की राज्यात या आठवड्यात सरासरी किती सोयाबीन दररोज येतो आणि कुठल्या बाजारात कसा भाव मिळतोय. चला तर जाणून घेऊ या सोयाबीनच्या बाजाराबद्दल.

तर बंधूंनो आज शनिवार म्हणजेच आठवड्याचा शेवटचा दिवस असून मागच्या शनिवारी ६४ हजार क्विंटल आवक झाली होती सरासरी. तर रविवारी केवळ सव्वा नऊच हजार झाली. नंतरच्या दिवसात म्हणजेच सोमवारपासून राज्यात सोयाबीनची सरासरी ७५ ते ८० हजार दररोज आवक होत राहिली. शुक्रवारी म्हणजेच ३ जानेवारी रोजी त्यात बरीच घट झाली. तीन जानेवारीला राज्यात एकूण ७५ हजार १९५ सोयाबीन आवक झाली.

आता बाजारभाव काय होते ते जाणून घेऊ या. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक आवक लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची झाली. या ठिकाणी सुमारे ११ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी ४१५० रुपये बाजारभाव मिळाला. कमीत कमी ३८८३, तर जास्तीत जास्त ४३०० रुपये बाजारभाव मिळाला.

बंधूंनो, तुमच्या एक लक्षात आले का की मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यातही लातूर बाजारात सोयाबीनचे बाजारभाव स्थिरावले आहेत. मागच्या आठवड्यात ते साधारणत: ४१५० रुपये होते. याही आठवड्यात सरासरी ४१०० ते ४१५० असेच आहेत. मात्र विदर्भातील बाजारात सोयाबीनच्या बाजारात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान शुक्रवारी अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४१०० रुपये, हिंगणघाटला ३७५०रुपये, मलकापूरात ३७०० रुपये असे होते.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *