
Maize market price : शेतकरी मित्रांनो या बातमीतून आपण मका पिकाच्या आवकेबद्दल जाणून घेणार आहोत. तर मंडळी, या आठवड्यात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये मक्याची दररोजची आवक साधारणत: ३० ते ३२ हजार क्विंटल आहे. दरम्यान ३ जानेवारी शुक्रवार रोजी राज्यात ११ हजार ६८४ क्विंटल आवक झाली.
दिनांक २ जानेवारी रोजी राज्यात ३७ हजार १६२ क्विंटल मका आवक झाली होती. तर मागील रविवारी सर्वात कमी म्हणजेच केवळ अडीच हजार क्विंटल आवक झाली.
शेतकरी मित्रांनो आता आपण कुठल्या बाजारात मका पिकाने भाव खाल्ला ते पाहू. तर शुक्रवारी म्हणजेच ३ जानेवारी रोजी राज्यातील कुठल्या बाजारात मका पिकाची सर्वाधिक आवक झाली आणि कुठे चांगला बाजारभाव मिळाला ते आपण पाहू.
शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच सुमारे साडेसहा हजार क्विंटल मका आवक झाली. लासलगावच्या निफाड उपबाजारात सरासरी २३६५ रुपये, लासलगावमध्ये २३३० रुपये, पिंपळगाव बसवंत-पालखेड बाजारात २३९० रुपये बाजारभाव मिळाला. शहादा बाजारात लाल मक्याला २२४३ रुपये बाजारभाव मिळाला. सिल्लेडला पिवळ्या मकाला २१०० रुपये बाजारभाव मिळाला, तर सर्वाधिक भाव राज्यात मुंबई बाजारात मिळाला. येथे सरासरी ३५०० रुपये बाजारभाव मिळाला.