kanda bajarbhav today: सोमवारपासून कांद्या्चया बाजारभावात थोडीशी वाढ होऊन आठवडा संपत आला असताना कालपासून बाजारभावात १ ते २ रुपयांनी घसरण होताना दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत या आठड्यात कांद्याचे बाजारभाव काहीसे वाढलेले आणि स्थिरावले असून सरासरी २१ ते २४ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याला मिळताना दिसत आहेत.
आज शुक्रवार दिनांक ३ जानेवारी २५ रोजी लासलगाव विंचूर बाजारसमितीत कांद्याला सरासरी २३५० रुपये, किमान १ हजार तर जास्तीत जास्त २८०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी २३०० रुपये, कमीत कमी १ हजार आणि जास्तीत जास्त ३१२२ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. याठिकाणी कांद्याची १८ हजार क्विंटल आवक झाली.
पुणे बाजारात आज लोकल कांद्याची सुमारे १५ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी २५५० रुपये कांदा बाजारभाव मिळताना दिसत आहे. तर मंगळवेढा बाजारात सरासरी २५०० रुपये बाजारभाव आहे.
कोल्हापूर बाजारसमितीत आज लोकल कांद्याला सरासरी २३०० रुपये, जास्तीत जास्त ४ हजार आणि किमान ८०० रुपये बाजारभाव मिळताना दिसत आहे. दरम्यान आज सर्वाधिक बाजारभाव सांगलीच्या फळे आणि भाजीपाला बाजारात मिळाला आहे. सांगलीत लोकल कांद्याची ४ हजार ७८० क्विंटल आवक होऊन याठिकाणी कमीत कमी १ हजार आणि जास्तीत जास्त ५५०० रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी ३२५० रुपये बाजारभाव मिळाला.