
Shaktipeth highway : शक्तिपीठला पुन्हा एकदा बळ मिळण्याचीशक्यता आहे कारण पुन्हा शक्तिपीठ महामार्ग बांधण्यासाठी हालचालींना आता वेग आलाय शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय . यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पहिलं पाऊल उचललंय ज्या ठिकाणी विरोध आहे तो भाग वगळून शक्तिपीठ महामार्गाचं काम सुरू करण्यात येणार. असल्याची माहिती सध्या मिळते समृद्धी महामार्गाच्या धरतीवर नागपूर ते गोवा असा पाच किलोमीटर चा हा महामार्ग आहे. महामार्गासाठी अंदाजे 85 हजार कोटी रुपये खर्च केले जाते बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा अंतर दहा तासांमध्ये पार करता येणे शक्य होणार आहे नागपूर ते गोवा जाण्यासाठी सध्या 20 ते 22 तास लागतात.
हा महामार्ग समृद्धी महामार्गाहून अधिक लांबीचा ठरणार आहे. एमएसआरडीसीकडून शक्तिपीठ एक्स्प्रेस वे या ८०२ किमी लांबीच्या महामार्गाचे काम केले जाणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्गाविरोधात जोरदार मोर्चे काढले होते. या विरोधाची दखल घेत महायुतीच्या नेत्यांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सप्टेंबरमध्ये या महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने रद्द केली होती.
आता निवडणुका संपताच पुन्हा या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. एमएसआरडीसीने पर्यावरण मंजुरीसाठी १० जानेवारी २०२५ ला प्रस्ताव पाठविला आहे. नव्या प्रस्तावात यापूर्वीचाच मार्ग निवडला आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पर्यावरण दाखल्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला होता. आता देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर याप्रकल्पासाठी पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. हा महामार्ग गोवा (पत्रादेवी) ते विदर्भातील वर्धा जिल्ह्यापर्यंत जोडला जाणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
हा महामार्ग ८०२ किलोमीटर लांब आहे, जो ७०१ किलोमीटर लांबीच्या सध्या अंशतः सुरू असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापेक्षा अधिक आहे. सध्या गोव्यातून रस्तामार्गे नागपूरला जाण्यासाठी १८ ते २१ तास लागतात.हे अंतर १ हजार ११० किलोमीटर आहे.शक्तीपीठ महामार्गामुळे ते अंतर ८०२ किमीचे होणार आहे. सहापदरी शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाची लांबी नागपूर-मुंबई महामार्गापेक्षा जास्त असेल.पत्रादेवी येथे या महामार्गाची सुरुवात होऊन तो वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे संपणार आहे.
८६ हजार ३०० कोटींचा प्रकल्प..
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमएसआरडीसीने गेल्यावर्षी या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. राज्य सरकारने त्याची अधिसूचना काढून १२ जिल्ह्यांमध्ये २७ भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती.वर्धा ,नागपूर, यवतमाळ, हिंगोली ,नांदेड ,लातूर ,बीड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,गोवा या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे .