
Soybean Procurement Extension : नमस्कार तुम्ही वाचत आहात कृषी २४ तास (krishi24.com),अखेर सोयाबीन खरेदीला 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे परंतु 31 जानेवारी पर्यंत उरलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केलं जाणार का हा खरा प्रश्न आहे. कारण सुरुवातीपासून सोयाबीनची खरेदीची गती ही अगदीच धीमी आहे त्यामुळेच आत्तापर्यंत केवळ उद्दिष्टाच्या 30% पर्यंतच खरेदी पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे. मग आता 31 जानेवारी पर्यंत उरलेलं 70% उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदणी केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी होईल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात आजही बारदाना नेमका किती दिवसांमध्ये पोहोचेल हे खरेदी केंद्रांना सांगण्यात आलेलं नाहीये.
आता सरकारने स्पष्ट केलं की उद्या किंवा परवा आम्ही खरेदी केंद्रांना बारदाना पुरवू आणि त्यानंतर खरेदी सुरळीत सुरू होऊ म्हणजेच 15 जानेवारीला जरी बारदाना पोहोचला तरी उरलेल्या 16 दिवसांमध्ये खरेदी किती होईल हे निश्चित सांगता येत नाहीये राज्यात सोयाबीन खरेदीची मुदत ही 12 जानेवारी पर्यंत होती परंतु सरकारनं 12 जानेवारी पर्यंत कुठलंही मुदतवाढीचं माहिती दिली नव्हती किंवा पत्रक काढलं नव्हतं त्यामुळे 13 जानेवारीला म्हणजे आज राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी ठप्प होती पण सोयाबीनची खरेदी खरं तर आजच ठप्प नव्हती तर गेल्या आठ ते 15 दिवसांपासून बहुतेक खरेदी केंद्रांवर खरेदी बंदच होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे बारदाण्याची टंचाई. अनेक खरेदी केंद्रांकडे बारदाना नव्हता आणि नाफेड जुन्या बारदाण्यामध्ये सोयाबीन घ्यायला तयार नव्हतं त्यामुळे खरेदी केंद्रांना इच्छा नसूनही खरेदी बंद ठेवावी लागली होती .राज्यात बारदाण्याची टंचाई निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्याच्या वाट्याला जो बारदाना येणार होता तो इतरत्र वळवण्यात आला होता त्यामुळे राज्याला कमी बारदाना मिळाला आणि त्यातल्या त्यात जूट कमिशनन बारदाण्याचे भाव वाढवले होते आणि नाफेड जो काही रेट देत होतं तो कमी होता त्यामुळे नेमकं या दरातली तफार कोण भरून काढणार हा खरा मुद्दा होता.
आता सरकारनं बारदाना पुरवठ्यासाठी टेंडर काढल्याची माहिती आहे आणि पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये बारदाना पुरवठा केला जाईल असं देखील सांगितलं जातंय आता जर सरकारनं खरंच उद्या किंवा परवा बारदाना दिला तरच खरेदी वेगाने सुरू होईल पण जर सरकारने आणखीन उशीर केला तर या मुदतवाढीचा काही तेवढा फायदा होणार नाही नाही असं खरेदी केंद्रांनी स्पष्ट केलंय आता एकूणच जर आपण आढावा घेतला तर राज्यात जवळपास 7 लाख 49 हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी जवळपास दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून झालंय म्हणजेच आजही सव्वा पाच लाख शेतकरी सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत शेतकरी सोयाबीन खरेदीसाठी आपला घरामध्ये ठेवून आहेत म्हणजेच नाफेडच्या खरेदीची वाट पाहत आहेत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खुल्या बाजारात आजही सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा 900 ते हजार रुपयांनी कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडला सोयाबीन द्यायचंय परंतु नाफेडची खरेदी म्हणजेच सोयाबीनची हमीभावना खरेदी ही सुरुवातीपासून खूपच धीम्या गतीने सुरू आहे आता अशी अपेक्षा व्यक्त करूयात की जी काही मुदतवाढ दिली त्या मुदतवाढीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी केलं जाईल आणि आपले केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचे सगळं सोयाबीन हमीभावाने खरेदी करू सगळ्या शेतकऱ्यांचं तर सोडा पण परंतु किमान ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यांचं तरी सोयाबीन सरकारने आता घ्यावं अशीच माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायेत.
आता तुम्हाला काय वाटतं दिलेल्या मुदतवाढीमध्ये किमान ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यांचं तरी सोयाबीन खरेदी केलं जाईल का आम्हाला नक्की कळवा तसं रोज आम्ही शेतीमाल बाजारभाव, सरकारी योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या कृषी २४ तास (krishi24.com ) व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा आणि हे आर्टिकल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका.