
Maize growth : संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ जानेवारी रोजी लासलगाव बाजारात मक्याची सुमारे ५ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव २१०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २४७६ रुपये, तर सरासरी २३७० रुपये प्रति क्विंटल असे होते.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची सुमारे ५ हजार आवक होऊन सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सिल्लोड बाजारात पिवळ्या मक्याला सरासरी २२०० रुपये दर मिळाला.
दरम्यान मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु. २२५० प्रती क्विंटल होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विंटल असून सध्या मक्याच्या किंमती हमीभावापेक्षा पेक्षा जास्त आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय पातळीवर ३.८०% इतकी घट झाली आहे व राज्य पातळीवर १३.४७% इतकी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक रु. २२६३/ क्विंटल होती, तर जालना बाजारात सर्वात कमी किंमत रु. २१६३/ क्विंटल होती.संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ जानेवारी रोजी लासलगाव बाजारात मक्याची सुमारे ५ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव २१०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २४७६ रुपये, तर सरासरी २३७० रुपये प्रति क्विंटल असे होते.