State Executive President : भाजपाकडून रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड ,काय आहे समीकरण?

State Executive President  : महाराष्ट्रात 132 जागा जिंकत भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देताना जुन्या मंडळींना मात्र मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं सर्वात महत्त्वाचं नाव होतं रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती त्यामुळे मंत्रिमंडळातून त्यांचं नाव कसं वगळण्यात आलं याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं त्याच वेळी भाजप चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपद देऊ शकतो याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या अखेर या चर्चा काही प्रमाणात खऱ्या ठरल्या असंही म्हणावं लागेल .

भाजपनं 12 जानेवारीला शिर्डीतील एकदिवसीय महाधिवेशनापूर्वीच रवींद्रचव्हाणांना महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केलंय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही निवड केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतच पत्रक काढून ही नियुक्ती केली आहे भाजपनं पहिल्यांदाच राज्यात प्रदेश कार्याध्यक्ष पद निर्माण केल्याचंही बोललं जातंय सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर तर बावनकुळे आहेत पुढील दोन ते चार महिन्यात बावनकुळे आपलं प्रदेशाध्यक्ष पद काढून रवींद्र चव्हाणांना देतील असंही म्हटलं जातंय तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदाचा गृहपाठम्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद राहिलं पण हे प्रश्न आहे. भाजपन रवींद्र चव्हाणांची निवड राज्याच्या कार्याध्यक्षपदी का केली रवींद्र चव्हाणांची निवड करून भाजपनं कुठले डाव साध्य केलेत पाहूयात.. 

भाजपन रवींद्र चव्हाणांकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद देऊन खेळलेला पहिला डाव म्हणजे मराठा समाजाला पक्षात महत्त्वाचं स्थान दिलंय भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातून येतात तर रवींद्र चव्हाण मराठा समाजाचे आहेत चव्हाणांच्या आधी चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्या रूपाने भाजपन मराठा समाजाला प्रदेशाध्यक्षपद दिलं होतं पण लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात मराठा आरक्षणावरून भाजपला मोठी किंमत मोजावी लागली विशेषतः जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला होता पण विधानसभा निवडणुकीवेळी मराठा समाज भाजपच्या बाजूनेच झुकलेला दिसला त्यामुळे भाजपला राज्यात मोठं यश मिळाल्याचं दिसलं अशा वेळी मराठा समाज आता भाजपच्या बाजूला वळला असताना मराठा समाजाला पुन्हा निराश करणं हे भाजपला परवडण्यासारखं नाही त्यामुळे मराठा समाजाला शांत करण्यासाठी भाजपन रवींद्र चव्हाण यांच्यावर डाव खेळल्याचं बोललं जातंय तर दुसरीकडे चव्हाणांकडे फक्त मराठा नाही तर हिंदुत्ववादी मराठा चेहरा म्हणूनही पाहिलं जातं मराठा संघ हिंदुत्व आणि भाजप असा मिलाप म्हणून पक्षश्रेष्ठीने चव्हाणांकडे राज्याचं कार्याध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येतं एकनाथ शिंदे देखील हिंदुत्ववादी व मराठा अस्मिता असणारे नेते मात्र जरंगे पाटलांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे बळ देत असल्याची चर्चा कुठेतरी धर्मापेक्षा जातीचा फॅक्टर मोठा ठरवणारी झाल्याचं बोललं जातं.

त्यामुळे मराठा समाजाला जाती पलीकडे नेऊन हिंदुत्वाच्या माध्यमातून आपल्या पक्षाला जोडून ठेवण्यासाठी मराठा असलेले रवींद्र चव्हाण भाजप साठी कार्याध्यक्ष म्हणून फायद्याचे ठरतील भाजपन रवींद्र चव्हाण यांच्यावर डाव खेळण्याचं दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदेना लगाम लावणं भाजप पुढे हिंदुत्ववादी विचार यांचा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच सगळ्यात मोठं आव्हान आहे पण एकनाथ शिंदे यांना आव्हान फक्त रवींद्र चव्हाणच देऊ शकतात हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातून येतात त्यामुळे हे दोघे एकमेकांचे राजकीय स्पर्धक असल्याचंही बोललं जातं तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोकण प्रांताची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे होती.

कोकणात शिंदे गटाला सगळ्यात जास्त शह दिला तो रवींद्र चव्हाण यांनी या शहातूनच कोकणात रवींद्र चव्हाण विरुद्ध रामदास कदम असा वाद निर्माण झाला.

यावेळी भाजप रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत शिंदे गटाला कोकणातून बाहेर काढते असं सुद्धा आरोप झाले कोकणात सध्या दोन पक्ष प्रभावी आहेत पहिला म्हणजे भाजप आणि दुसरा पक्ष शिंदे गट भाजपन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोकणात 15 जागा जिंकल्या तर दुसरीकडे शिंदे गटाने सुद्धा 15 जागा जिंकल्या त्यामुळे कोकणात भाजप आणि शिंदे गट एकमेकांना तुल्यबळ आहेत असंही म्हणावं लागेल आता शिंदे गट असाच कोकणात तुल्यबळ राहिल्यास भाजपला सगळ्यात मोठा धोका असल्याचंही बोललं जातं त्यामुळे शिंदे गटाला कोकणात शह देण्यासाठी रवींद्र चव्हाण महत्त्वाचे ठरू शकतात आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील या निवडणुकात मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी चव्हाण भाजप साठी उपयोगी ठरू शकतात यात सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात या ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहेत त्यामुळे शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका जिंकण्यासाठी जोर लावणार हे निश्चित समजलं जातंय.

आता ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका जर पुन्हा एक एकनाथ शिंदेंनी जिंकल्या तर भाजप ठाणे जिल्ह्यातून बॅकफुटला जाऊ शकते त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि कोकण परिसरात चेकमेट करण्यासाठी भाजपन रवींद्र चव्हाणांवर डाव खेळण्याचंही बोललं जातंय रवींद्र चव्हाणांवर भाजपन डाव खेळण्याचं तिसरं कारण रवींद्र चव्हाणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या सोबत असणारी जवळीकता देवेंद्र फडणवीस 2014 जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले म्हणून रवींद्र चव्हाण यांचा उदय झाला कोकणात देवेंद्र फडणवीसांनी टाकलेली जबाबदारी असो व शिंदेंनी बंड केल्यानंतर गोव्यावरून शिंदेना मुंबईत आणण्याची जबाबदारी असो या सगळ्या मोहिमा रवींद्र चव्हाणांनी व्यवस्थित रित्या पार पाडल्या यातून रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांमध्ये आपोआप गेले.

फडणवीसांसोबत असणाऱ्या जवळीकतेमुळे रवींद्र चव्हाणांना कार्याध्यक्ष पद मिळाल्याचंही बोललं जातं पण फडणवीसांसोबत असणारी जवळीक हे रवींद्र चव्हाणांचे कार्याध्यक्ष होण्याचं एकमेव कारण नाही तर चव्हाणांना संघात सुद्धा पाठिंबा आहे हे महत्त्वाचं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरली नसल्याचं विधान केलं होतं त्यामुळे संघाच्या गोटात प्रचंड नाराजी पसरली गेली असंही म्हटलं गेलं त्यातून लोकसभेत संघ निष्क्रिय राहिला आणि त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपची गाडी 240 वरच अडकली आणि केंद्रात मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची वेळ भाजपवर आली.

त्यानंतर मात्र भाजपनं चूक सुधारत आर एस एस ला निवडणुकीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाजपनं हरियाणा आणि महाराष्ट्रात एक हाती वर्चस्व निर्माण केलंय त्यानंतर संघाच्या इच्छेनुसार राज्यात फडणवीसांना मुख्यमंत्री केलंय त्यानुसार राज्यात पुन्हा संघाच्या मुशीत तयार झालेल्या रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्षपद देऊ केलंय या गोष्टींमुळे राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाढण्यास मदत होईल असंही बोललं जातंय याचा फायदा अमित शहांच्या 2019 ला राज्यात शतप्रतिशत भाजप या नाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी होणार आहे तसेच रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.

राज्याचा कार्यभार हाकताना फडणवीसांना पक्ष संघटनेकडे लक्ष देणं तसेच मित्रपक्ष आणि विरोधकांच्या हालचालींची माहिती घेण्यावर मर्यादा आहे त्यासाठी फडणवीसांना चव्हाणांची मोठी मदत होऊ शकते म्हणून राज्यात एक प्रकारे शतप्रतिशत फडणवीस असंच काहीस चित्र दिसून येणार आहे यापूर्वी 2014 ला प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भाजपला 122 त्यानंतर 2019 ला चंद्रकांत पाटील यांनी 105 आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात भाजपन 102 32 जागा मिळवल्यात आता रवींद्र चव्हाण यांचे प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करून भाजपनं शतप्रतिशत भाजप या मार्गावरून वाटचाल केली असंच म्हणावं लागेल कारण रवींद्र चव्हाण मराठा आहेत तर दुसरीकडे फडणवीसांच्या जवळचे आहेत यात त्यांना संघाचा पाठिंबा आहे यात चव्हाणांना प्लस ठरतो तो मुद्दा म्हणजे विरोधक कमकुवत असणं त्यामुळे आगामी काळात रवींद्र चव्हाण किती यशस्वी होतात.

हे पाहणं महत्त्वाचं ठरतं तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाणांची कार्याध्यक्षपदी निवड करून भाजपनं कुठले डाव खेळलेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *