
Makar sankranti til gul bajarbhav: आज दिनांक १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मुंबई बाजारात तीळाची सुमारे ४०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर १३ हजार ५०० रुपये तर सरासरी १६ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. मुंबईत राज्यातील इतर बाजारांपेक्षा तीळाला दर चांगले आहेत.
दरम्यान काल संक्रांतीच्या पूर्वसंध्येला विदर्भातील कारंजा बाजारात ७० क्विंटल तीळाची आवक होऊन सरासरी ९ हजार ३५५, तर किमान ८ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मलकापूर बाजारात तीळाला सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल, मालेगाव बाजारात पांढऱ्या तीळाला सरासरी दहा हजार आणि कल्याण बाजारात सरासरी १६ हजार ५०० रुपये असा बाजारभाव होता.
गुळाचे असे आहेत बाजारभाव
दरम्यान संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाला काय भाव मिळत आहेत ते जाणून घेऊ यात. आज सकाळी उपलब्ध माहितीनुसार १४ जानेवारी रोजी मुंबई बाजारात लोकल गुळाला सरासरी ५५५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे. या ठिकाणी गुळाची सुमारे १ हजार क्विंटल आवक झाली.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर काल सांगली बाजारात गुळाची १०४९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ३३५०, तर सरासरी ३५५३ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पुणे बाजारात एक नंबर गुळाला ३७८१ रुपये प्रति क्विंटल, जालना बाजारात पिवळ्या गुळाला ३५७५ रुपये प्रति क्विंटल, अहिल्यानगरमध्ये ३६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.