
Transactions will be done through your face:शहर असो किंवा ग्रामीण भाग, शहरी नागरीक असो वा शेतकरी सध्या अनेकांचे व्यवहार हे आधार कार्डशी संबंधित प्रणालीने होत असून भविष्यात आता पैशांचे, बँकांचे व्यवहार करण्यासाठीही या प्रणालीचा वापर होणार आहे. त्यासाठी कुठलेही कार्ड बाळगण्याची गरज नसून तुमचा चेहरा स्कॅन केला की लगेच हे व्यवहार होणा आहे. त्याची सुरूवातही झाली आहे.
आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला, केवळ पाच महिन्यांत ५० कोटींवरून दुप्पट वाढ झाली. २०२१ मध्ये सुरू झालेली ही AI/ML आधारित प्रणाली विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षित आणि सुलभ ओळख पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे.
फेस ऑथेंटिकेशनचा वापर: आधार फेस ऑथेंटिकेशन प्रणालीला सध्या ९२ सरकारी आणि खासगी संस्था वापरत आहेत. ही प्रणाली सुरक्षित, संपर्कविहीन आणि कुठेही, कधीही वापरण्यास सोयीस्कर आहे.
नुकतीच आधार’द्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील ५०० हितधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात आधारच्या विविध उपयोजनांवर चर्चा करण्यात आली.
बँकिंग, एनबीएफसी, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आधारच्या वापरासाठी चार पॅनल चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. या सत्रांमध्ये आधारच्या माध्यमातून सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना व धोरणांवर विचारमंथन करण्यात आले. दरम्यान भविष्यात आधारद्वारे सेवा वितरण अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने UIDAI च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. वित्त, दूरसंचार, फिनटेक आणि सार्वजनिक सेवांमध्ये आधारच्या वापराचा विस्तार करण्याचा उद्देश ठेवला आहे.