turmeric to gram bhajarbhav:या सप्ताहात हळदीपासून हरभऱ्यापर्यंत असे होते शेतमालाचे बाजारभाव

turmeric to gram bhajarbhav

turmeric to gram bhajarbhav:अनेक शेतकऱ्यांना सप्ताहात कुठल्या शेतमालाचे काय बाजारभाव राहिलेत याची उत्सुकता असते. त्यावरून बरेच शेतकरी आता पुढील आठवड्यात काय बाजार असतील याचा अंदाज काढण्याचा प्रयत्न करतात.

या आठवड्यातील शेतमालाचा आढावा म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांसाठी मुद्दाम देत आहोत. कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या तज्ज्ञांनी यासंदर्भात अहवाल दिला आहे.

त्यानुसार रविवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात कुठल्या शेतमालाचे दर सरासरी कसे राहिले त्याची माहिती घेऊ. मक्याला सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठड्यात बाजारभाव टिकून राहिले आहेत.

हरभऱ्याला सरासरी ६ हजार ९० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात हरभराच्या बाजारभाव वाढलेले दिसून आले. दुसरीकडे तूरीला सरासरी ७ हजार २७० रुपये बाजारभाव मिळाले. त्यातही प्रति क्विंटल प्रमाणे वाढ
झालेली दिसून आली. सोयाबीनचे बाजारभाव काहीसे स्थिर राहिल्याचे दिसत आहेत. सोयाबीनला आठवड्यात सरासरी ४१६२ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

टोमॅटो, कांदा, हळद, कापूस यांचे बाजारभाव मात्र घसरल्याचे दिसून आले. कापसाला सरासरी ७१९९रुपये, कांद्याला २०७० रुपये, टोमॅटोला ९२५ रुपये, हळदीला १३ हजार २५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले.

Leave a Reply