Ajit Pawar : मुंडेंमुळे अजितदादा अडचणीत; आता शरद पवार आणि ठाकरे एनडीएत जाणार?

Ajit pawar : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. दुसरीकडे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे आरोप अजूनही होताना दिसत असून मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील आमदारांच्या बैठकीस मुंडे अनुपस्थित होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत मिळत होते.

दरम्यान आता या प्रकरणानंतर आता भाजपाच्या वरिष्ठ आणि संघाच्याही धुरिणांनी अजित पवार गटालाच पर्याय शोधायला सुरूवात केल्याची चर्चा आहे. त्यातून आगामी काळात केंद्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थन घेतले जाणार असून राज्यातही हे दोन्ही गट सत्तेत दिसू शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चांचा खुद्द शरद पवार आणि ठाकरे यांच्याकडून इन्कार होत असला, तरी आतून काहीतरी राजकारण शिजत असल्याचे कार्यकर्त्यांचे खात्रीदायक म्हणणे आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि आंध्रप्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी केंद्राला पाठिंबा दिला असला, तरी त्यांची राजकीय कारकीर्द बेभरवशाची समजली जाते. भविष्यात त्यांनी पाठींबा काढला, तर केंद्र सरकार कोसळू शकते. त्यामुळेही सध्या एनडीएमध्ये नवे गट येण्याची भाजपाला गरज आहे. त्यातच राज्यात मस्साजोग खून प्रकरण आणि मंत्री मुंडेंचा त्याच्याशी जोडला जाणारा संबंध यामुळेही भाजपा सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.

महाराष्ट्रात भाजपाला अवघ्या ४ ते ५ आमदारांची बहुमतासाठी गरज आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट हे दोन्हीही सत्तेत नसले, आणि ठाकरे आणि शरद पवार गटाने जरी पाठींबा दिला, तरी युतीचे बहुमत होऊ शकते. मध्यंतरी सामना दैनिकातून होणारी सरकारची टिकाही आता सौम्य होऊ लागली आहे. खासदार संजय राऊत यांची सरकारविरोधी वक्तव्येही आता मऊ झालेली आहेत. तसेच ठाकरे गटाला आता भविष्यासाठी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणे भाग आहे.

हे लक्षात घेता उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार गट दोन्हीही आगामी काळात महायुती सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात. तर मंत्री मुंडे यांच्यावर कारवाईसह अजित पवार गटाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी चर्चा सत्ताधारी गटातील कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

Leave a Reply