
PM Kisan : शेतकऱ्यांना पीएम किसानच्या १९ व्या हप्ता खात्यात कधी येणार याची काळजी आहे. हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळू शकतो मात्र त्यासाठी एक काम करणे महत्त्वाचे आहे. ते जर केले नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही.
ते महत्त्वाचे काम आहे केवायसी पूर्ण करणे आणि नावनोंदणी करणे. त्यासाठी मुदत आहे ३१ जानेवारी २५ पर्यंत. जर तुम्ही पीएम किसानसाठी नावनोंदणी केली नाही, तर तुम्हाला पुढील हप्ता म्हणजेच १९ वा हप्ता मिळणार नाही.
अनेक लोक शेतकरी नसताना आणि प्रत्यक्ष शेती करत नसताना पीएम किसानचा लाभ घेतात. त्यात काही मोठे आणि श्रीमंत शेतकरीही आहेत. पण खऱ्या शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळण्यासाठी म्हणून सरकारने पीएम किसानच्या नावनोंदणीची पद्धत आणली आहे. ज्यांनी अजूनही या योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल, त्यांनी ती ३१ जानेवारीच्या आत करायची आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की किसान योजनेचा १८वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर २४ ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता १९ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. त्यासाठी पीएम किसान पोर्टलवर नावनोंदणी करावी लागणा आहे. तसेच केवायसीही करावी लागणार आहे.