
bananas tax:अनेक ठिकाणी केळीवर करपा आणि सिगाटोकाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. या आठवड्यात केळीची कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी केले आहे.
केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.