
loan scheme: शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना जर स्वत:चा व्यवसाय करायचा असेल, तर मुद्रा योजनेअंतर्गत पर्याय उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना डेअरी, पशुपालन किंवा प्रक्रिया उद्योगासह विविध उद्योग व्यवसाय छोट्या भांडवलावरही करता येतात. त्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत भांडवल मिळते.
मुद्रा योजनेमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागासह शहरांतही अनेक तरुण आणि शेतकऱ्यांनी स्वत:चे छोटे-छोटे व्यवसाय उभारले असून त्यातून ते स्वत:च्या पायावरही उभे राहिले आहेत. तर काहींनी इतरांनीही रोजगार दिले आहेत. दरम्यान याच मुद्रा लोनसंदर्भात एक मोठी बातमी समजत आहे. ती म्हणजे या लोनच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या किती मिळते कर्ज
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत मुद्रा योजना राबविण्यात येते. त्यात शिशु, किशोर आणि तरुण अशा विविध श्रेणी आहेत. सध्या शिशु श्रेणीत ५० हजारांचे कर्ज मिळते. किशोर श्रेणी अंतर्गत ५०,००१ ते ५ लाख रुपयांपर्यंत आणि तरुण श्रेणी अंतर्गत ५,००,००१ ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. मात्र येणाऱ्या अर्थसंकल्पात आता ही मर्यादा वाढणार असून नवीन व्यवसाय स्थापन करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सध्या किती मिळते कर्ज?:
सध्या असलेल्या शिशु, किशोर आणि तरुण या श्रेणी अंतर्गत मिळणाऱ्या कर्ज रकमेत आता वाढ होण्याची शक्यता आहे. संबंधित मंत्रालयाने ही मर्यादा वाढविण्याची शिफारस केली आहे. याचे कारण म्हणजे २०२५ सालापर्यंत सुमारे २.३० लाख कोटी कर्जवाटपाचे उदिष्ट होते. मात्र ते केवळ ९६ हजार कोटी रुपये पर्यंतच पूर्णत्वास गेले. दुसरीकडे ५० हजार ही रक्कमही तशी कमी पडते. त्यामुळे जर किमान मर्यादा वाढली, तर उदिष्ट पूर्ण होऊन उद्योजकांना पुरेसे भांडवल मिळेल.
अर्थ संकल्पात किती वाढणार कर्ज? :
दरम्यान या अर्थसंकल्पात पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत शिशु आणि किशोर श्रेणींमध्ये कर्ज मर्यादा वाढवण्याची शिफारस आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी संसदेत होत आहे. अर्थ मंत्रालयाला पाठवलेल्या प्रस्तावात शिशु श्रेणी अंतर्गत कर्ज मर्यादा ५ लाख रुपये आणि किशोर श्रेणी अंतर्गत १० लाख रुपये करण्याची सूचना करण्यात आली आहे. तरुण श्रेणी अंतर्गत मिळालेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी तरुण प्लस श्रेणी तयार करण्यात आली आणि या अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली.