Bapu andhale : बापू आंधळे प्रकरणात महादेव गीते चा व्हिडिओ पुढे,वाल्मिक कराड आणि बापू आंधळे वादात नवा ट्विस्ट..

Bapu Andale : सुरेश धस यांनी लावून धरली आहेत त्याचबरोबर जून 2024 मध्ये झालेल्या सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातही आता नवीन खुलासे होऊ लागलेत आंधळे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून बबन गित्तेचे नाव घेतलं गेलं सध्या बबन गित्ते फरार आहे मात्र बबन गित्तेचा बापू आंधळे यांच्या खुनाशी काहीही संबंध नसल्याचं भाजप आमदार सुरेश दस यांनी म्हटलं होतं आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या महादेव गीतेचा एक जुना व्हिडिओ पुढे आणलाय या प्रकरणात बबन गीतेचा कोणताही संबंध नसून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझ्यावर गोळीबार झाल्याचा दावा महादेव गीतेने केलाय तसंच बापू आंधळे हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड कनेक्शन महादेव गीतेच्या या व्हिडिओ मधून समोर येतंय त्यामुळे एकीकडे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड वर मोका लागलेला असतानाच आता या प्रकारे प्रकरणातही वाल्मिक कराड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते .

बापू आंधळे हत्या प्रकरण नेमका आहे काय त्यावरून महादेव गीतेने केलेला दावा काय त्यानं वाल्मिक कराड वर केलेले आरोप काय  सगळ्यात आधी बापू आंधळे हत्या प्रकरण थोडक्यात समजून घेऊयात 29 जून 2024 ला परळीत मरळवाडीचे सरपंच अजित पवार गटाचे पदाधिकारी बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती त्यावेळी झालेल्या गोळीबारात सोबत आलेले ज्ञानोबा उर्फ गित्ते आणि आरोपींतील महादेव गीते जखमी झाले होते.

घटनेनंतर गीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार 29 जूनच्या रात्री साडे आठ वाजता ही घटना घडली महादेव गित्ते यांना कट रचून बापू आंधळे आणि गित्ते यांना परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावलं होतं तिथं बबन गित्ते यांना बापू आंधळेना शिवीगाळ करत पैसे आणले का असं विचारलं त्यावर बापू आंधळे यांनी आईवरून शिव्या देऊ नका असं म्हटलं होतं तेव्हा बबन गित्तेनं त्याच्या कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली तितक्यात राजाभाऊ नेहरकरने आंधळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला आणि त्यातच आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर महादेव गीतेने ज्ञानोबा उर्फ गीत्ते याच्यावर गोळी झाडली ती गोळी गोट्याच्या छातीच्या उजव्या बाजूला घासून गेली तर मुकुंद गीते आणि राजेश वाघमोडे यांनी गीतेला मारहाण केली यात गंभीर जखमी झाल्याचे आरोप करण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी शशिकांत उर्फ भवन गीतेसह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता .

त्यावेळी राजकीय वादातून बबन गीत्तेनं बापू आंधळे यांचा खून केल्याची चर्चा होती बापू आंधळे हे शरद पवार गटाचे नेते बबन गित्तेच्या पॅनलच्या माध्यमातून मरळवाडीचे सरपंच झाले होते त्यानंतर बापू आंधळे यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता तसंच पैशांच्या देवाण घेवाणी वरूनही या दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमधील वाद जास्त चिघळल्याचं बोललं जात होतं लोकसभा निवडणुकीत आंधळे हे धनंजय मुंडे यांच्या गटात असल्यानं गीते यांनी त्यांना अनेकदा जाब विचारल्याची माहिती देत त्यातूनच आंधळे यांची हत्या झाल्याची चर्चा होती एकीकडे गीतेनं बापू आंधळे हत्या प्रकरणात बबन गीते आणि त्याच्या साथीदारांवर आरोप केलेले असतानाच दुसरीकडे महादेव गीतेनेही आपली तक्रार दिली होती या तक्रारीत मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र नंतर वाल्मिक कराडचा तपासात सहभाग आढळला नाही त्यामुळं तपास अधिकाऱ्यानं या गुन्ह्यातून वाल्मिक कराडचं नाव कमी केल्याचा आरोप झाला बापू आंधळे हत्या प्रकरणानंतर बबन गीते फरार आहे तर या प्रकरणातील इतर चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे यामध्ये महादेव गीते याचाही समावेश आहे सध्या महादेव गीते हा न्यायालयीन कोठडीत असून त्याला बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलाय पण आता याच महादेव गीतेचा 2 जुलै 2024 किस्सा म्हणजेच बापू आंधळे यांच्या हत्येनंतर तीन दिवसांनी केलेला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणलाय आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार घेताना महादेव गीतेने हा व्हिडिओ केल्याचं आव्हाडांनी म्हटलंय .

यामध्ये महादेव गीतेने अनेक धक्कादायक दावे केलेत त्या व्हिडिओमध्ये महादेव गीतेनं नक्की काय म्हटलंय ते आता बघूयात मी महादेव उद्धवराव गीते दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंधळे सनी देवडे हे तिघेजण आले त्यावेळी त्यांनी मला सांगितलं वाल्मिक अण्णांचे काम का करत नाहीस? तुला जिवे मारायला सांगितलंय त्यावेळी मी त्यांच्या हातापाया पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पण जाता जाता ते म्हणाले की आम्ही तुला आज संध्याकाळी ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गित्ते याला पण गुंतवायची तयारी झालेली आहे आणि ते तिघे निघून गेले त्यानंतर एक दीड तासांनी माझा शेजारी बाबा सातबाईचा फोन आला त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुडकायला लागलेत तू घरातच लपून राहा मला त्यांचे फोन येत आहेत की तू घरी आहे की नाही हे विचार म्हणून यानंतर मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो . माझी आजी एक्सपायर झाली होती . त्यावेळी माझ्या गावाकडील काही लोकांना भेटता आलं नव्हतं त्यामुळे दोघं तिघेजण मला घरी भेटायला आले होते आम्ही घरातच बसून होतो आम्ही घरात असतानाच ते लोक आले त्यांनी माझ्या घरावर दगड फेक केली आणि माझी गाडी देखील फोडली बापू आंधळे ओळखीचा असल्यानं मी बाहेर आलो तर त्यानं मला छातीत बुक्की मारली त्यावर मी त्याला का मारलं असं विचारलं त्यावेळी तो म्हणाला की वाल्मिक बाबूराव कराड यांनी तुला जिवे मारून टाकायला सांगितलंय त्यावेळी गाडीच्या मागे राजा फड आणि गोट्याच्या हातात गण होती.  तर सोमनाथ सलगरे सनी देवडे यांच्या हातात कोयते होते त्यांनी माझ्यावर अंधाधुंध फायरिंग केली त्यातील तीन गोळ्या मला लागल्या यातच एकजण कोणीतरी ओरडलं की अरे अण्णांनी काय सांगितलंय.

त्याच्यावर फोकस करा त्याच अंधाधुंद फायरिंग मध्ये त्यांनी बापू आंधळेला गोळ्या घालून मारून टाकलं आणि सर्वजण तिथून फरार झाले जर त्यावेळी माझ्याकडे हत्यार असतं तर मी त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं तीन बुलेट लागलेल्या असतानाही मी स्वतःच गाडी सुरू करून रुग्णालयात आलो त्यामुळे यापुढे माझ्यासह माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला काहीही झालं तरी त्याला वाल्मिक कराड जबाबदार राहील ही घटना घडत असताना बबन गीते हे माझ्या घरापाशी नव्हते या घटनेशी त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही ते तिथे उपस्थित नव्हते असा दावा महादेव गीतेनं 2 जुलै 2024 ला केलेल्या व्हिडिओत केलाय या प्रकरणी महादेव गीतेने दिलेल्या फिर्यादीत बापू आंधळे राजेश उर्फ धनराज फड रघुनाथ फड ज्ञानोबा ऊर्फ मारुती गित्ते, सनी देवडे, सोमनाथ सलगरे, वाल्मीक; कराड यांच्यासह इतर 20 अधोळखी व्यक्तींचा समावेश आहे दरम्यान महादेव गीतेचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की या प्रकरणात महादेव गीतेनं वाल्मिक कराडचं नाव घेतलंय मात्र पुरावे असूनही वाल्मिक कराडचं नाव काढून टाकलं जातंय हे पोलिसांनी लावलंय काय आणखी किती पुरावे द्यायचे पुरावे देऊनही नाव काढलं जात असेल तर करायचं काय असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय दरम्यान विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गित्ते हे शरद पवार गटाकडून लढण्याची तयारी करत होते त्यामुळे बबन गित्तेला या प्रकरणात गुंतवण्याचा हा प्लॅन वाल्मिक कराड केल्याची चर्चा होती त्यात सुरेश धस यांनीही बबन गित्तेचा आणि आंधळे यांच्या खुनाचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय तर बनावट नोटा प्रकरणी फरार सनी आठवलेनं कराड हा पोलिसांना हाताशी धरून तरुणांना कसा खोट्या गुन्ह्यात अडकवतो याची ही माहिती सोशल मीडिया वरून दिली आहे आता महादेव गीतेने केलेल्या दाव्यानुसार बापू आंधळे हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराड कनेक्शन समोर आल्यामुळे आता या प्रकरणातलं सत्य काय बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात नक्की दोषी कोण असा सवाल पुन्हा एकदा समोर येऊ लागलाय तुम्हाला काय वाटतं महादेव गीतेने केलेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का या प्रकरणामुळे वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण लेख वाचायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *