
Keli lagwad: उन्हाळ्यात केळी लागवड करताना आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करा तापमानातील बदल केळी पिकावर होणार नाही. बरेच शेतकरी फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीकडे वळतात किंवा केळी करीत असल्याचं निर्देशनस येत आहे. त्याला कारण असे की गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असून शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होत आहे.
परंतु एक Cucumber mosaic virus नावाचा विषाणूजन्य रोग हा नेमका उन्हाळी लागवडीमध्ये जास्त प्रमाणावर होतो. हा रोग होण्यास कारणीभूत असलेले विषाणू हे जवळ जवळ दोन हजार प्रकारच्या Host plants वर उपजत असतात आणि त्यांना पोषक हवामान ज्यावेळेस मिळते. त्यावेळेस झपाट्याने त्याची वाढ होते आणि नेमक्या ह्या उन्हाळ्या लागवडीमध्ये तापमान वाढीचा वाईट परिणाम केळी पिकावर होत आलेला आहे.
परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की ह्या तापमान वाढीचा जो परिणाम आहे त्याला केळी पिकावर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी केळीच्या दोन ओळींमध्ये आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत तेलबिया संशोधन केंद्र जळगाव यांच्या नियमित संपर्कात असलेले एक प्रगतशील शेतकरी महेश भाऊ गाडे यांनी मागील तीन वर्षापासून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. याही वर्षी ते पाच एकर क्षेत्रावर ती केळीमध्ये तीळ पिकाची अंतर पीक म्हणून लागवड करण्या करिता महात्मा फुले कृषी विद्यापीठा द्वारा नुकतीच उन्हाळी हंगामासाठी प्रसारित झालेली फुले पूर्ण या जातीचे बियाणे घेऊन गेलेत. त्यांचे अनुभव शेतकऱ्यांसाठी फार मोलाचे आहेत.
केळीच्या पिकात ते बटाट्याचे ही पीक आंतरपीक म्हणून यशस्वीपणे घेत आले आहेत.
तीळ पिकाची लागवड आपण संक्रांत झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून र्फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत कधीही करू शकतो. उशिरा लागवड केल्यास हे पीक जून महिन्यातील पावसात सापडतं म्हणून पावसात सापडायला नको म्हणून आपण योग्य कालावधी निवडायला हवा.
तीळ पिकास पकवतेस 90 दिवस जास्तीत जास्त लागतात आणि ह्या 90 दिवसांमध्ये तीळ पिकाची वाढ साधारणता एकशे वीस सेंटीमीटर पर्यंत होत असते आणि तीळ पिकाचे पान ही भाल्याच्या आकाराची किंवा भेंडीच्या आकाराची असल्याकारणाने त्या पिकाची सावली छान प्रकारे जमिनीवर पडत असते आणि नेमका या सावलीचा फायदा त्यामध्ये लागवड केलेल्या केळी पिकास उन्हाळ्या हंगामामध्ये होतो आणि केळीच्या पिकाच संरक्षण या सावलीमुळे होतं आणि त्या ठिकाणच सूक्ष्म तापमान तयार होऊन उष्ण तापमान पासून केळीचं संरक्षण होण्यास मदत होते.
पर्यायाने सी एम व्ही सारख्या रोगास प्रतिबंध तयार होतो. केळीचं पीक पाच बाय पाच फुटाच्या अंतरावरती ठिबक संच अंथरून आपण नियमित करीत आलेलो आहेत आणि ह्याच ठिबक संचाच्या नळीपासून पंधरा सेंटीमीटर अंतरावरती दोघ बाजूने तीळ पिकाची लागवड दोन रोपातील अंतर दहा सेंटिमीटर ठेवून करावी.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारा नुकतीच तिळीची उन्हाळी हंगामासाठी फुले पूर्ण नावाची जात प्रसारित झालेली आहे या जातीचा उपयोग आपण उन्हाळी हंगामामध्ये लागवड करण्यासाठी करावा. केळी पिकासाठी जे सेंद्रिय किंवा रासायनिक खत किंवा विद्राव्य खताचे मात्रा आपण देत असतो त्याच खतांच्या मात्रावर तीळ पिक अतिशय उत्तमरीत्या येत असत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ पिकाला कोणतेही जंगली जनावर खात नाही आणि त्यामुळे संपूर्ण क्षेत्राची राखण जंगली जनावरांपासून तीळ पीक करीत असत हा एक लक्षात घेण्यासारखा विषय आहे.
तीळ पीक एक प्रकारचं संरक्षण कवच मुख्य पिकासाठी करीत असत असं म्हणायला हरकत नाही. विकास लागवडीपासून ते काढणीपर्यंत 90 दिवस लागतात आणि नेमकं ह्या 90 दिवसात उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेल असत आणि त्या तापमान वाढीचा वाईट परिणाम केळीच्या पिकावर होत असतो. केंद्र शासन या वर्षापासून तेलबिया पिकांसाठी विशेष मोहीम राबवित असून शासनाच्या दरामध्ये शासकीय पातळीवरती तेल बिया पिकांची खरेदी केंद्र उघडून MSP च्या भावामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादित माल घेण्यासाठी त्यांनी विविध योजना आणलेले आहेत.
उन्हाळी हंगामामध्ये तीळ पिकापासून हेक्टरी आठ ते दहा क्विंटल पर्यंत उत्पन्न सहज घेता येते आणि आजचा बाजार भाव बघितल्यास दोनशे रुपये किलोने जरी दर धरला तरी शेतकऱ्यास हेक्टरी दोन लाख रुपये मिळतात आणि तेही 90 दिवसात. तीळ पीक लागवड करताना बियाणास प्रक्रिया आणि कीटकनाशकाच्या दोन फवारण्या एवढ्याच करावे लागतात काढणीचा खर्चही अतिशय कमी आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी फार मोठी संधी आहे आपल्याला फुले पूर्ण जातीच तिळीचे बियाणे तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे शासकीय दरात म्हणजे 225 रुपये प्रति किलो याप्रमाणे उपलब्ध आहे