halad bajarbhav : हळदीच्या बाजाराला झळाली येणार; या सप्ताहात असा होता बाजार…

सोमवारी आठवड्याच्या सुरूवातीला सांगली बाजारात हळदीला सरासरी १३ हजार ८२५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. हिंगोली बाजारात सरासरी १२ हजार ६५०, नांदेड बाजारात १३ हजार तर बसमत बाजारात १२ हजार ३५५ रु प्रति क्विंटल बाजारभाव होते. मंगळवारी मुंबई बाजारात हळदीचे दर २० हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते.

दरम्यान मागील आठवड्यात हिंगोली बाजारात हळदीची किंमत रु. १३२५० प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ३०.८९% व १८.७५% इतकी घट झाली आहे.

मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी सांगली बाजारात हळदीची सरासरी किंमत सर्वाधिक रु. १३९००/ क्विंटल होती, तर रिसोड बाजारात सर्वात कमी किंमत रु. १२३२५/क्विंटल होती अशी माहिती बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिली आहे.

२०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे.

२०२३-२४ मध्ये भारताने १.६२ लाख टन हळद निर्यात केली आहे, जी मागील वर्षी १.७० लाख टन इतकी होती. हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे.

जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८०% योगदान आहे, त्यानंतर चीन (८%), म्यानमार (४%), नायजेरिया (३%) आणि बांगलादेश (३%) यांचा क्रमांक लागतो.

सन २०२३-२४ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
– महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *