
tur bajarbhav: आज सकाळी वरूड बाजारात लाल तुरीला कमीत कमी ६२०० आणि सरासरी ६५८३ रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाले.
दरम्यान मंगळवारी राज्यात तुरीला सरासरी ६७०० रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळाले. दोंडाईचा, जि. धुळे बाजारात तुरीला किमान ५ हजार आणि सरासरी ६१०० रुपये बाजारभाव मिळाले, शहाद्यात सरासरी ६२२५ रुपये बाजारभाव होते. पैठण बाजारात तुरीला ६७०० रुपये बाजारभाव होते. भोकर बाजारात ६७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.
दरम्यान लातूर बाजारात लाल तुरीची सुमारे ८ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी ६९००, जास्तीत जास्त ७ हजार ३७५ आणि सरासरी ७२०० रुपये बाजारभाव मिळाला. अकोला बाजारात लाल तुरीची सुमारे २२०० क्विंटल आवक होऊन किमान ६ हजार, जास्तीत जास्त ७ हजार ६७० रुपये आणि सरासरी ७ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. हिंगणघाटला ७ हजार ६२० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
तूर वधारणार का?
या आठवड्यात तुरीच्या किंमती हमीभावापेक्षा खाली आल्याचे दिसून येत आहे. मात्र बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन यावर्षी सारखेच राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आगामी काळात तुरीचे भाव वधारू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या खरीप हंगाम २०२४-२५ साठी किंमान आधारभूत किंमत रु. ७५५० प्रति क्विं. आहे