kanda sheti: हा एकच उपाय आणि कांद्यावरील रोगाचा नायनाट; जाणून घ्या..

kanda sheti:महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात कांदा पिकाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

कांदा बीजोत्पादनासाठी अशी घ्या काळजी: पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा पहिला हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. नत्र खताचा दुसरा हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पीक संरक्षण
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण होईल. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने, हेक्झाकोनॅझोल १ मिली अधिक कार्बोसल्फान १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.

वरील फवारणीनंतर सुद्धा पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण झाले नाही, तर प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम किंवा थायरम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.

फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या करू नयेत. कारण या फवारण्यांमुळे मधमाश्यांना हानी पोहोचते. त्याचा परागीकरणावर विपरीत परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *