kanda bajarbhav: सोमवारी आवक घटली; कांदा बाजारभाव स्थिरावले..

Onion Market

kanda bajarbhav: मागच्या सोमवारी राज्याच्या बाजारांत एकूण ३ लाख ६५ हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. संपूर्ण आठवडाभर राज्यात कांद्याची सरासरी आवक २ लाख ७० हजार क्विंटलच्या आसपास राहिल्याने बाजारभाव फारसे खाली न जाता टप्प्या टप्प्याने कमी झाले. मात्र या आठवड्यात रविवारी कांदा आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली, तर सोमवारी काल कांदा आवक २ लाख ८ हजार क्विंटल इतकी राहिल्याने बाजारभाव शनिवारच्या तुलनेत टिकून राहिले.

लासलगाव बाजारात कांद्याचे बाजारभाव सोमवारी सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटल होते. एकूण लाल कांद्याची आवक २४ हजार ३९७ क्विंटल झाली. कमीत कमी बाजारभाव ९०० तर जास्तीत जास्त २६६८ रुपये प्रति क्विंटल असे होते. पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांदयाला सरासरी २ हजाराचा बाजारभाव मिळाला.

पुणे बाजारात आवक घटली. एकूण ११ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी बाजारभाव २ हजार रुपये राहिले. रविवारच्या तुलनेत या बाजारभावात ५० पैशांची घसरण पाहायला मिळाली. सोलापूर बाजारात मागील आठवड्याच्या तुलने आवक पुन्हा घटून स्थिरावताना दिसत असून बाजारभाव जास्तीत जास्त ३२०० रुपये, कमीत कमी २०० रुपये आणि सरासरी १७०० रुपये असे होते. राहुरीत बाजारभाव १७०० रुपये प्रति क्विंटल होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *