Soybean market price : अमरावती बाजारात मंगळवारी सोयाबीनची सुमारे ८ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३८०० तर जास्तीत जास्त ४ हजार आणि सरासरी ३९०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दरम्यान हमीभाव खरेदी बंद झाल्यानंतर चालू सप्ताहात राज्यातील बहुतेक बाजारातील सोयाबीनचे दर ४ हजार किंवा त्याच्या खाली घसरलेले पाहायला मिळाले.
मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४१३६ प्रती क्विंटल होली त्याच्या आधीच्या आठड्याच्या तुलनेत किमतीत २.१% वाढ झाली असल्याचे बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षातील जाणकारांनी सांगितले आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीबर १७ टक्क्यांनी घट झाली आहे.
दरम्यान मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४१३६/क्विंटल) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती कमी (रु.३९०३/क्विंटल) होत्या.












