Chana Market : हरभरा हे आपलं रब्बीतल महत्त्वाचं पीक आहे. परंतु हरभऱ्याचा भाव गेल्या काही महिन्यांपासून कमीच होतोय हरभऱ्याचा उच्चांकी भाव आपण जवळपास ₹8000 पाहिला होता . त्यानंतर मागच्या दोन-तीन महिन्यांमध्ये हरभऱ्याचा भाव कमी कमी होत गेलाय आता परिस्थिती अशी आहे की हरभऱ्याचा भाव ₹6000 पेक्षा कमी आहे. बहुतांश बाजारांमध्ये हरभरा सध्या 5200 ते ₹5800 दरम्यान विकला जातोय म्हणजेच काय तर हरभरा – हमीभावापेक्षा देखील कमी भावात विकला – जातोय बरं आपल्या शेतकऱ्यांना यांचा नवा म्हणजेच रब्बी हंगामातला नवा हरभरा अजून बाजारात दाखल व्हायचा आहे.
जेव्हा आवक्याचा दबाव वाढेल तेव्हा नेमकं बाजारात काय होईल आम्हाला हमीभाव तरी मिळेल का अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून आहे आणि नेमकं याच विषयावर आज आपण एक आढावा घेणार आहोत की नेमकं यंदा उत्पादनाची परिस्थिती – काय आहे काय राहू शकते. त्यानंतर पेरणीची – परिस्थिती कशी आहे. तसंच यंदा उत्पादनाचे अंदाज काय लावले जात आहेत शेतकऱ्यांना यंदा कसा बाजारभाव मिळू शकतो शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन कसं करायला हवं किंवा जेणेकरून त्यांच्या पदरामध्ये चांगला रेट मिळू शकतो या सगळ्या घडामोडींचा आपण थोडक्यात आढावा आता घेण्याचा प्रयत्न करूयात तर यंदा हरभरा लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपल्या रब्बी हंगामातल्या लागवडीला सुरुवात झाली होती किंवा शेतकऱ्यांची सुरुवात करण्याची तयारी होती त्या काळामध्ये हरभऱ्याचा भाव हा तेजित होता जवळपास हरभरा त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला ₹7000 दरम्यान दिसत होता त्यामुळे शेतकरी हरभऱ्याची लागवड वाढवतील अशी चर्चा बाजारामध्ये सुरू होते परंतु झालं उलटं जस जसं पेरणीचा कालावधी पुढे होत गेला म्हणजेजस जशी पेरणी पुढे येत गेले तस तसं बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव देखील कमी कमी होत गेला आणि जेव्हा पेरणी आटोपती आली . किंवा पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आली.
त्या परिस्थितीमध्ये हरभऱ्याचे भाव हे सहा हजारांपेक्षा देखील कमी झाले होते म्हणजे जवळपास हरभराच्या भावामध्ये जेवढी तेजी आली होती तेवढी तेजी कमी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा जो काही पेरा सुरुवातीला जास्त दिसत होता नंतरच्या – टप्प्यामध्ये म्हणजे जस जशी पेरणी पुढे – गेली तस तसे हरभऱ्याची पेरणी देखील कमी – कमी होत गेले आता परिस्थिती अशी आहे की – म्हणजे 30 डिसेंबरला म्हणजे लेटेस्ट डेटा किंवा लेटेस्ट आकडेवारी की सरकारने पुढे जाहीर केली त्यांमध्ये असं दिसतंय की हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षी एवढी जवळपास आपल्याला दिसून येते. गेल्या वर्षी जवळपास म्हणजे डिसेंबरच्या शेवटपर्यंत देशात 93 लाख 17 हजार हेक्टर वरती हरभऱ्याची पेरणी – झाली होती ती यंदा केवळ 81000 हेक्टर ने जास्त दिसते. म्हणजेच हरभऱ्याची पेरणी आपल्याला जवळपास 93 लाख 91000 हेक्टर पर्यंत दिसते म्हणजे पेरणीची जी काही वाढ आहे किंवा पेरणी मधली जी काही आघाडी आहे ती 1% पेक्षा देखील कमी आहे आता गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे दुष्काळ होता . रब्बी पेरणीसाठी अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता नव्हती त्यामुळे साहजिकच हरभऱ्याची पेरणी कमी झाली होती.
परंतु यंदा तर पाऊस पाणी जास्त आहे पाऊसमान देखील जास्त आहे परिस्थिती देखील पूरक आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची पेरणी जी वाढेल अशी जी अपेक्षा होती ती अपेक्षा फोल्ड ठरताना दिसते. त्यामुळे हरभराच्या उत्पादनात जे काही विक्रमी वाढीचा अंदाज सुरुवातीला लावला जात होता त्या प्रमाणात उत्पादन होते होणार नाही हे जवळपास निश्चित होतंय आता राहिला मुद्दा दुसरा की नेमकं हरभऱ्याचे उत्पादन किती होईल आता गेल्या हंगामामध्ये सरकारच्या अंदाजानुसार 123 लाख टन एवढं उत्पादन झालं होतं असा – सरकारचा अंदाज होता परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे की आपल्याला माहिती आहे .की मागच्या दोन-तीन वर्षांपासून रब्बी पिकांना वाढत्या उष्णतेचा फटका बसतो . म्हणजे फेब्रुवारी पासूनच आपल्याला उन्हाचे चटके जाणवायला लागतात मार्चमध्ये आणखीन उष्णता वाढत असते.
त्यासोबतच अवकाळी पाऊस गारपीट हे संकट तर ठरलेलेच असतात या सगळ्यांचा परिणाम हरभरा उत्पादनावर आपल्याला दिसू शकतो .मग आता ह्या सगळ्या घडामोडीनुसार उत्पादन गेल्या वर्षी एवढं राहिलं किंवा त्यापेक्षा काहीस अधिक जरी झालं म्हणजे जी काही चर्चा बाजारामध्ये सुरू आहे. तरी देखील शेतकऱ्यांनी यंदा चिंता करण्याचं गरज नाहीये. आताचा जो आपण बाजारभाव बघितला तो बाजारभाव जवळपास आपल्याला हमीभावाच्या आसपास दिसतोय अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की यंदा उत्पादन थोड्याफार प्रमाणात वाढलं तरी बाजारभाव यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील अशी परिस्थिती नाहीये, बाजारामध्ये तसे घटक नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारकडे दरवर्षी जो काही हरभराचा शिल्लक स्टॉक असायचा एक 20 22 लाख टनांचा तो यंदा तेवढा नाहीये जेव्हा नवीन हंगाम सुरू होईल, तेव्हा सरकारकडे जास्तीत जास्त सहा ते सात लाख टनांच्या दरम्यान हरभरा राहू शकतो असा अंदाज आतापासून व्यक्त केला जातोय म्हणजेच काय तर सरकारला यंदा हमीभावानं हरभऱ्याच्या मोठ्या प्रमाणात खरेदी करावं लागेल. सरकार तूर ,मसूर किंवा मग, इतर कडधान्य सोडून हरभऱ्याची खरेदी जास्त का करत नाही ? कारण देशात आपण जर कडधान्याचं उत्पादनाचा एक आकडा पाहिला तर त्यामध्ये हरभरा उत्पादनाचं प्रमाण हे जास्त असतं म्हणजे मोठ्या प्रमाणात हरभरा उपलब्ध असतो .
तुलनेमध्ये हरभऱ्याचे भाव देखील कमी असतात त्यामुळे सरकार हमे भावानं हरभऱ्याची खरेदी जास्त करत असतं आणि जेव्हा कडधान्याचे रेट वाढतात आता आपल्याला माहिती आहे कडधान्याचे जवळपास आपल्याला – एकूण गरजेच्या 25 ते 30% आयात करावी लागते आता आयातीमुळे रेट देखील वाढत असतात या परिस्थितीमध्ये देशांतर्गत भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार हमीभावानं हरभऱ्याची – खरेदी करून ठेवतं स्टॉक करून ठेवत असतं दरवर्षी आपण जर मागच्या वर्षी जर बघितलं तर जवळपास 20- 22 लाख टन सरकार कडे हरभरा – होता मागच्या हंगामातला परंतु यंदाची – परिस्थिती अशी आहे की यंदा खूप कमी प्रमाणात असणार म्हणजे सरकारची खरेदी यंदा वाढू शकते.
हा एक महत्त्वाचा घटक आहे जो बाजाराला आधार देणारा ठरू शकतो तसंच खुल्या बाजारात देखील हरभराचा स्टॉक कमी – प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळेच हरभराचे – भाव तेजीत आले होते या सगळ्या कारणांमुळे – हरभराचे भाव हे पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगले दिसू शकतात पण खरा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांचा हा आहे की जेव्हा आमचा बाजारात येईल की सगळे शेतकरी आपण थांबू शकत नाही की हरभरामध्ये तेजी कधी येईल हरभऱ्याचे भाव नेमके कधी वाढतील आपला आपण जेव्हा हातात येतो त्याच्या पुढच्या दोन तीन महिन्यांमध्येच बहुतांश म्हणजे जवळपास 70 टक्के शेतकरी आपला विकत असतात तर मग या परिस्थितीमध्येबाजारभाव का राहू शकतो तर ज्या काळामध्ये -की हरभऱ्याच्या आवकेचा दबाव मोठ्या – प्रमाणात असो हा कालावधी जवळपास महिना दीड – महिन्याचा असतो तर या काळामध्ये निश्चितच – हमीभावापेक्षा काहीसा बाजार कमी होऊ शकतो – असा अंदाज आहे यंदाचा हमीभाव 5650 रुपये – तर कदाचित मार्केट आपल्याला 5300 पासून – दिसू शकतं परंतु ज्या या परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा आवक्याचा दबाव असतो ज्या शेतकऱ्यांना लगेच आपला विकायचा आहे .
त्या शेतकऱ्यांना हमीभावाचा एक चांगला पर्याय आहे जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यंदा सरकारला देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करावं लागेल कारण सरकारकडे स्टॉक खूपच कमी आहे तर आपण सुरुवातीलाच – म्हणजे आतापासूनच सरकारच्या नोंदणीकडे जर – लक्ष ठेवून राहिलं जर सरकारचा सरकारला हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी आधीच करून – ठेवली तर जेव्हा आपला हातात येईल तेव्हा आपण त्याचा ओलावा म्हणजे त्याची वाळवण करून सरकारची जी काही अट आहे जो काही निकष आहे त्या प्रमाणात मध्ये ओलावा आणल्यानंतर आपण हमीभावान देऊ शकतो थोडक्यात या परिस्थितीत मध्ये देखील आपल्याकडे एक हमीभावाचा चांगला पर्याय आहे परंतु त्याची तयारी आपल्याला आधीपासूनच करून ठेवावी लागेल बहुतांश वेळेला असं होतं की आपल्या हातात आल्यानंतर आपण नंतर नोंदणी करतो त्यानंतर खरेदीचे खरेदीसाठी वाट पाहावी लागते आणि आवक आल्यानंतर सगळे शेतकरी एकदाच जात असल्यामुळे या सगळ्या अडचणी पुढे येत असतात आणि खरेदीसाठी वेळ लागत असतो तर सरकारने असं सांगितलेलं आहे की आम्ही हरभरा देखील किंवा तूर देखील खरेदी करू काही राज्यांमध्ये सरकारने तूर खरेदीचे आदेश दिलेलेच आहे हरभऱ्याच्या देखील लगेच – पुढे येतीलच तर हमीभावाच्या खरेदीकडे – शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं जसं एकदा आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर हरभरा दरामध्ये आपल्याला म्हणजे खुल्या बाजारामध्ये दर देखील आपल्याला – हमीभावाच्या दरम्यान पोहोचलेले दिसू शकतात त्यासाठी आपल्याला कदाचित पुढे आणखीन दोन तीन महिने वाट पाहावी लागू शकते की जेव्हा आपल्याला माहिती आहे की एक मार्च आणि एप्रिल मध्ये हरभरा आवक्याचा दबाव मोठ्या प्रमाणात तो फेब्रुवारी पासून वाढायला सुरू होतो.
त्यानंतर दोन महिन्यांमध्ये आपल्याला खुल्या बाजारामध्ये देखील हरभराचे भाव – हमीभावाच्या दरम्यान दिसू शकतात असं एकूणच – बाजारातले जे काही परिस्थितीवरून दिसतो – त्यानंतर हरभराच्या दरामध्ये जेव्हा एकदम कमी होईल आणि बाजारातले कमी होईल त्या त्या काळामध्ये हरभराच्या दरामध्ये आणखीन सुधारणा होऊ शकते असा एक अंदाज आहे म्हणजे कदाचित त्यासाठी आपल्याला एक मे च्या नंतरची वाट पाहावी लागू शकते त्यावेळी हरभरा आपल्याला सहा हजाराचे पातळी ओलांडताना दिसू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायेत परंतु ही बाजारातली जी – परिस्थिती आहे तर ही म्हणजे जो काही अंदाज – आहे तो अंदाज आता आणखीन आपल्या हातात – यायचा आहे तर अनेक घटक आहे की सरकारची – खरेदी आहे त्यानंतर उत्पादन आहे या सगळ्या परिस्थितीवर अवलंबून असतात तर ह्या परिस्थिती जशा बदलतील तसं आपल्याला बाजारावर परिणाम सुद्धा होताना दिसू शकतो कदाचित जर समजा पुढच्या काळामध्ये – हरभऱ्याचं नुकसान जास्तच झालं तर – हरभरामध्ये सुधारणा आपल्याला कदाचित जास्त – दिसू शकते खुला बाजार देखील आपल्याला हमीभावापासूनच सुरू होताना दिसू शकतो तर ह्या सगळ्या परिस्थितीकडे आपण लक्षात ठेवावं आणि एकूणच आपली आपल्याला कधी विकायचा आहे .
आपण किती दिवस थांबू शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून बाजाराकडे लक्ष ठेवून बाजारामधल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचा दरावरती काय परिणाम होतो कसा परिणाम होतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो राहू त्या त्या – वेळेला नेमकं त्या त्या वेळेचे घटक कुठलेआहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा आणि एक विक्रीचं नियोजन करा जर समजा आपल्याकडे जास्त उत्पादन असेल आता जे शेतकऱ्यांची जमीन किंवा लागवड एकदम कमी असते त्यांच्याकडे उत्पादन साहजिक कमीच असतं 10-12 क्विंटल ते थांबू शकत नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन जास्त आहे – त्यांनी जर दोन-तीन टप्प्यांमध्ये आपला विकला तर त्यांना एक एवरेज रेट चांगला मिळू शकतो म्हणजे तेंदीचा सुद्धा फायदा घेऊ शकतो परंतु हे सगळं करत असताना बाजारातल्या घडामोडीकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे कारण त्याचा परिणाम दरावरती होतं असतो.












