Kanda Rate : चाकण बाजारात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काय बाजारभाव मिळाला..

Kanda Rate : राज्यात महाशिवरात्रीनिमित्ती सुटी असल्याने कांदा आवक कमी होती. काल बुधवारी संपूर्ण राज्यात एकूण अवघी ४७ हजार कांदा आवक झाली.

आज गुरूवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हयातील खेड चाकण बाजारात सकाळच्या सत्रात २०० क्विंटल कांदा आवक झाली. सरासरी बाजारभाव २४०० हजार तर जास्तीत जास्त २७०० रुपये आणि कमीत कमी २ हजार बाजारभाव मिळाले.

पुण्याच्या मोशी बाजारात मात्र बाजारभाव पडलेले दिसून आले. या ठिकाणी सकाळच्या सत्रात ६०५ क्विंटल कांदा आवक होऊन सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. पिंपरी बाजारात १४५० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाले. कालच्या तुलनेत पिंपरी येथील बाजारभाव घसरलेले दिसून आले. तर चाकण येथील बाजारभाव स्थिर होते.

दरम्यान काल महाशिवरात्रीच्या दिवशी लासगलागाव बाजाराची उपबाजार समिती असलेल्या निफाड येथे उन्हाळी कांद्याची १६१ क्विंटल आवक होऊन सरासरी २२६० रुपये बाजारभाव मिळाले, तर नगर जिल्ह्यातील पारनेर येथे उन्हाळी कांद्याची १४ हजार ६८७ क्विंटल आवक झालेली असून सरासरी २०५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पुणे बाजारात काल सरासरी २०५० बाजारभाव लाल कांदय्ाला मिळाला.

Leave a Reply