Indrajit Sawant : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी माध्यमांमध्ये चित्रपटावर प्रतिक्रिया देताना छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सावंतांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सावंतांनी माध्यमांना सांगितलं होतं स्वतः इंद्रजीत सावंतांनी धमकीच्या फोनचं कॉल रेकॉर्डिंग आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं. प्रशांत कोरडकर नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि सोबतच त्यांना शिवरायांबद्दल अपशब्दही वापरले असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं.
पण सावंत यांनी आरोप केलेल्या प्रशांत कोरडकरांनी मी कोणतीही धमकी सावंतांना दिली नसल्याचं माध्यमांसमोर स्पष्ट केलं. त्यामुळे सावंतांना धमकी देणारी व्यक्ती नक्की कोण होती याचा तपास पोलीस करत असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर येते . ज्या प्रशांत कोरडकरांनी सावंतांनी केलेले आरोप फेटाळले होते . तेच कोरडकर सध्या गायब झाल्याची माहिती देण्यात येते. कोरडकरांनी जर धमकी दिली नव्हती तर त्यांच्या अशा अचानक गायब होण्याचं कारण काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. त्यातच कोरडकरांच्या संपत्ती सोबतच त्यांचे बड्या नेत्यांसोबत कॉन्टॅक्ट असल्याचाही आरोप होतोय. त्यामुळे आता हे प्रशांत कोरडकर नक्की आहेत कोण त्यांच्यावर होणाऱ्या आरोप काय आणि त्यांच्या गायब होण्याच्या चर्चा का होत आहेत त्याचीच माहिती दिली आहे . इंद्रजीत सावंतांनी छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला होता. संभाजी महाराजांच्या शत्रू सोयराबाई नव्हत्या तर शिवरायांच्या प्रधान मंडळातील हिरोजी फर्ज ,अण्णाजी दत्तो बाळाजी चिटणीस सोमाजी दत्तो हेच लोक संभाजी महाराजांचे खरे शत्रू होते असं सांगत सावंतांनी सिनेमाच्या स्टोरीवर आक्षेप नोंदवला होता त्यानंतर 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन आल्याची माहिती देण्यात आली . हा धमकीचा फोन नागपुरातून डॉक्टर प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीने केल्याचं सावंतांनी सांगितलं होतं.
सावंतांच्या म्हणण्यानुसार कोरटकरने त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या आणि सोबतच छत्रपती शिवरायांबद्दल तो अपशब्दही बोलल्याचं सावंतांनी माध्यमात मध्ये सांगितलं होतं. सावंतांनी त्यांना आलेल्या फोनचं कॉल रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर पोस्ट केलं तुम्ही बामनांबद्दल समाजामध्ये द्वेष पसरवू नका तुम्ही बामनांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात बामनांची ताकद काय ते दाखवून देऊ तुमचे महाराज पळून गेले होते हे सांगा ना असं म्हणत कोरडकरने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचं इंद्रजीत सावंतांनी माध्यमांना सांगितलं. सावंतांनी सोशल मीडियावर हे कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केल्यानंतर प्रशांत कोरडकर या नावाच्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झाली ,अशातच इंद्रजीत सावंतांनी धमकीचा आरोप केलेल्या प्रशांत कोरटकर यांनी माध्यमांमध्ये स्वतःवर होत असलेले आरोप खोटं असल्याचं स्पष्ट केलं.
सावंतांच्या टीकेला विरोध करताना प्रशांत कोरडकर म्हणाले इंद्रजीत सावंतांना फोन करणारा मी नाहीच मी सावंतांना ओळखतही नाही माझं नाव वापरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. सावंतांना ज्याने फोन केला तो आवाज माझा नाहीच माझ्याकडे सावंतांचा फोन नंबरही नाही आणि या आधी 15 वेळा माझं स्वतःच facebook अकाउंट हॅक झालं होतं सावंतांनी शहानिशा करून सोशल मीडियावर पोस्ट करायला हवी होती.
त्यांच्यामुळे मलाच धमकीचे फोन येतात असं म्हणत प्रशांत कोरडकरांनी स्वतःवरील आरोप फेटाळले होते तसेच त्यांनी नागपूर पोलिसात इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती तसेच ज्याने आपलं नाव वापरून खोटे आरोप केलेले आहेत . त्या अज्ञात व्यक्ती विरोधातही कोरडकरांनी तक्रार केली एका बाजूला कोरडकरांनी स्वतःवरील आरोप फेटाळले असले तरी दुसरीकडे मात्र कोरडकरांवर फक्त धमकी प्रकरणातच टीका होत नव्हती तर प्रशांत कोरडकरांचे बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत आणि त्यांच्याकडे एका बड्या माणसानं स्वतःची संपत्ती ठेवली आहे असे आरोपही करण्यात आले त्यामुळे प्रशांत कोरडकर नक्की कोण आहेत आणि त्यांच्यावर होणारे आरोप काय आहेत ते आता बघूयात . प्रशांत कोरडकरांवर टीका करताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी एक ट्वीट करून आरोप केला होता. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोषारी साहेबांपासून तर केंद्र तसेच राज्य सरकार मधील मोठ्या नेत्यांसोबत कोरडकरची उठबस असल्याची माहिती समोर येते शिवाय गुवाहाटी मध्ये देखील कोरडकर हजर होता अशी चर्चा आहे असं ट्वीट करत रोहित पवारांनी प्रशांत कोरडकरांचे बड्या नेत्यांसोबतचे फोटोही ट्वीट केले . रोहित पवारांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये प्रशांत कोरडकर भाजपचे जे पी नड्डा आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासोबत दिसत आहेत. एवढेच नाही तर प्रशांत कोरडकरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांसोबत सुद्धा फोटो असल्याचं सोशल मीडियावर दिसतंय त्यामुळे कोरडकर नक्की काय करतात की ज्यामुळे त्यांचे बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत असा सवाल विचारला जात होता प्रशांत कोरडकर पत्रकार असल्याचं सांगितलं जातंय त्यांचं माझा विदर्भ नावाचं youtube चॅनल असल्याचंही म्हटलं जातंय तर कोरडकरांचे facebook वर सर्वाधिक फोटो हे मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत आहेत माझे जवळचे मित्र असं कॅप्शनही या फोटोंना त्यांनी दिलंय पण स्थानिक youtube चॅनल असलेल्या माणसाचे एवढ्या बड्या नेत्यांसोबत आणि मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन कसे काय असेही काही सवाल उपस्थित केले गेलेत इतकच नाही तर कोरडकरांच्या संपत्तीवरूनही आरोप होताना दिसतात कोरडकरांसारख्या स्थानिक पत्रकाराकडे मर्सिडीज कार महागडे मोबाईल आणि महागडी घड्याळ कशी काय आहेत असेही काही सवाल उपस्थित होतात . त्यात कोरडकरांची कोट्यावधींची संपत्ती असल्याचंही तेथील काही स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळे प्रशांत कोरडकर यांच्यावर झालेल्या सगळ्या आरोपांमुळे आणि त्यांचे बड्या नेत्यांसोबत असलेल्या फोटोंमुळे कोरडकरांचे मोठे लागेबांधे असल्याच्याही चर्चा होत आहेत सावंतांना आलेल्या धमकीच्या फोन बाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं आणि कोल्हापूर पोलिसांना फोन करून योग्य तपासाचे आदेश सुद्धा दिले होते .
त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनीही तपासाला लागलीच सुरुवात केली इंद्रजीत सावंतांनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये त्यांना प्रशांत कोरडकरांनी दिलेल्या धमकीचं कॉल रेकॉर्डिंग जमा केलं सावंतांच्या धमकीचं कॉल रेकॉर्डिंग आधीच व्हायरल झाल्यानं प्रशांत कोरडकरांविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शन सुद्धा होत होती त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनीही कोरडकरांविरोधात चिघळलेलं वातावरण पाहून प्रशांत कोरडकरांवर अजामीन पात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर पोलिसांचे पथक प्रशांत कोरडकरांना ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी 27 फेब्रुवारीला नागपूर मध्ये गेलं तेव्हा कोरडकर गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं कोल्हापूर पोलिसांचं पथक जेव्हा नागपुरात कोरडकरांच्या घरी गेलं तेव्हा प्रशांत कोरडकर हे दोन दिवसा पासून घरी आलेच नसल्याचं त्यांना समजलं प्रशांत कोरडकर वर गुन्हा दाखल होताच तो पसार झालाय तो गुन्हा दाखल झाल्यापासून घरीही गेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे आतापर्यंत पोलीस इंद्रजीत सावंतांना धमकी नक्की कोणी दिली हा तपास करत होते मात्र आता पोलीस धमकीचा आरोप झालेल्या आणि आरोप फेटाळून गायब झालेल्या प्रशांत कोरडकरांचा शोध घेत आहेत त्यांना शोधण्यासाठी त्यांचा मोबाईल लोकेशनही पोलीस चेक करतायेत त्यांचा फोन बंद लागत असल्यामुळे त्यांचा मोबाईल लोकेशन मिळत नाही मात्र कोरटकर मध्यप्रदेशातील इंदोरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कोरडकरांच्या घरी कुणीही नसल्यानं त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांकडे सुद्धा पोलिसांनी शोधाशोध केल्याचं सांगण्यात येत आहे गुरुवारी पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने काढलेल्या सीडीआरच्या प्राथमिक माहितीनुसार नागपुरातूनच सावंत यांना फोन केल्याचं समोर आलंय या सगळ्यात कोल्हापूर पोलिसांना बेलतरोडा पोलीसही मदत करतात पण आपल्यावरचे आरोप फेटाळूनही कोरडकर गायब झाल्यानं त्यांच्या भोवती सध्या संशयाचं वातावरण निर्माण होतायत कारवाईच्या भीतीने तर त्यांनी पळ काढला नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जाते त्यामुळे प्रशांत कोरडकर नक्की कुठे आहेत आणि कोरडकरांनीच इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन केला होता का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता पोलीस शोधतात .












