Kanda Rate : अनेकांना उत्सुकता आहे की मार्च ते मे पर्यंत रब्बी कांद्याला कसे भाव मिळतील, त्याबद्दल आजच्या या लेखातून जाणून घेऊ यात. आजतागायत लाल कांदयाला लासलगाव बाजारसमितीत सरासरी २४०० ते २५०० रुपयांचा बाजारभाव या महिन्यात मिळाला. तर मागील आठवड्यात बाजारात येणाऱ्या उन्हाळी कांद्याला सरासरी २२०० रुपये बाजारभाव मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात लाल कांदयाला सरासरी दोन हजाराच्या वरतीच बाजारभाव मिळालेले आहेत.
राज्याच्या इतर बाजारसमितीत कांद्याला सरासरी १७०० ते २००० रुपयांच्या आसपास बाजारभाव या महिन्यात मिळाले.
यंदाची रबीची लागवड १७ फेब्रुवारीपर्यंतची आहे ९.९४ लाख हेक्टर इतकी आहे. मागच्या वर्षी एकूण लागवड होती १० लाख ८७ हेक्टर. तर रब्बीचे कांदा उत्पादन ७० टक्के असते आणि खरीपाचे ३० टक्के इतके असते.
देशात आतापर्यंत खरीप हंगाम यंदा: ३.८७ लाख हेक्टर लागवड झाली. लेट खरीपाची साधारणत: १६ लाख मे. टन झालेली आहे. मागच्या वर्षी हीच लागवड म्हणजेच २३-२४ मध्ये एकूण सुमारे १५ लाख हेक्टर होती यंदा त्यात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार १ लाख हेक्टरने वाढ झाली म्हणजेच खरीप आणि रब्बी मिळून यंदा ८ ते ९ टक्के वाढ झालेली आहे. थोडक्यात यंदाचे उत्पादन जे आहे ते एकूण ३०० लाख मे. टनाच्या आसपास राहू शकेल असा अंदाज आहे., म्हणजे २०२३च्या प्रमाणे.
दरम्यान खरीप आणि लेट खरीपाचा कांदा संपत आलेला आहे.
लासलगाव बाजारसमितीतील मागच्या काळातील मार्च आणि एप्रिलचे बाजारभाव बघूयात

कांदा वितरण कसे होते?
एकूण स्टोरेज: ४१ लाख मे. टन
लॉस : २० ते ३० टक्के ( ६० लाख मे. टन)
निर्यात: ६ ते ७ टक्के ( १८ ते २० लाख मे टन, त्यातील १० लाख मे. टन झालेली आहे)
प्रक्रिया: १० ते १२ लाख मे. टन
देशातील गरज १७० लाख मे. टन
एकूण वितरण : २९० ते ३०० लाख मे. टन
हे लक्षात घेता यंदा अतिरिक्त कांदा उरेल तो साधारणत: ५ लाख किंवा १० लाख मे. टन
थोडक्यात २ ते ३ टक्के कांदा अतिरिक्त होईल. त्या हिशेबाने बाजारभाव २ ते ३ टक्के कमी म्हणजे क्विंटलमागे ५ टक्के जरी धरले तरी किलो मागे जास्तीत जास्त १ ते दीड रुपयाने कमी मिळतील. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत एकूणच महागाई आणि आताचे बाजारभाव ५०० रुपयांनी वाढलेले आहेत हे लक्षात घेता त्यातही फारसा फरक पडेल असे सध्या तरी वाटते.












