Dhananjay Munde : धनंजय मुंडें यांनी राजीनामा दिला ..

Dhananjay Munde : अधिवेशनात विरोधक गुन्हेगाराशी संबंधित असलेल्या मंत्री धनंजय मुंडे च्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार असल्याचे लक्षात येताच .मस्साजोग घटनेने पुन्हा एकदा आक्रमक वळण घेतल्याने अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

दोनच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे राजीनामा देतील असे वक्तव्य त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी केले होते. मात्र काल मुंडे स्वत: अधिवेशनात उपस्थित होते. राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्रींपासून तर तब्येतीचे कारणे देत बरेचदा भावनिक गुंता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे सर्वच राजकीय डाव फोल ठरले आणि राजीनामा देण्याची वेळ आली. त्यांच्यावरही आता या प्रकरणात गुन्हा नोंदला जाणार का? असा प्रश्न राजकीय विरोधक करत आहेत.

देशमुख हत्या प्रकरणामधील फोटो समोर आल्यावर सोमवारी (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply