Soybean market price : राज्यात सोयाबीनला कसा दर मिळतोय? कुठल्या बाजारात सोयाबीन खातोय भाव? जाणून घ्या..

Soybean market price

Soybean market price : राज्यात २८ मार्च रोजी पिवळ्या आणि लोकल प्रतीच्या सोयाबीनला तुलनेने चांगला दर मिळाला. मागील पाच दिवसांतील बाजारभावाचा विचार करता, काही ठिकाणी किंमतीत वाढ झाली तर काही बाजारात किंचित घट दिसून आली.

दिनांक २८ मार्च रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनसाठी कमीतकमी ४०११ रुपये, जास्तीत जास्त ४३५१ रुपये तर सरासरी ४२०० रुपये दर मिळाला. जालना बाजारात सरासरी ४०५० रुपये, उमरेड येथे ४२५० रुपये, हिंगोलीमध्ये ३९१२ रुपये, तर जिंतूरमध्ये सरासरी ३८०० रुपये दर नोंदवला गेला.

लोकल प्रतीच्या सोयाबीनसाठी अमरावती बाजारात सरासरी ४१२५ रुपये, नागपूरमध्ये ३९८५ रुपये, सोलापूरमध्ये ४१७० रुपये तर परभणीमध्ये ४०५० रुपये दर मिळाला.

दरम्यान दि. २४ मार्च ते २८ मार्च या कालावधीत लातूर, अमरावती, नागपूर आणि लासलगाव बाजारातील सोयाबीन बाजारभावात चढ-उतार झाले. लातूर बाजारात २४ मार्चला सोयाबीनसाठी सरासरी ४०२५ रुपये दर मिळत होता. हा दर २८ मार्चला ४२०० रुपयांवर पोहोचला. अमरावती बाजारात २४ मार्च रोजी सरासरी ४०८० रुपये दर होता, तर २८ मार्चला तो ४१२५ रुपयांवर पोहोचला. नागपूरमध्ये २४ मार्चला ३९०० रुपये दर होता, तर २८ मार्चला तो ३९८५ रुपये झाला. लासलगावमध्ये २४ मार्च रोजी ४०११ रुपये दर होता, तर २८ मार्चला तो ४१७६ रुपयांवर गेला.

पिवळ्या सोयाबीनचे दर:
लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनसाठी सरासरी ४२०० रुपये दर मिळाला. अमरावतीमध्ये ४१२५ रुपये, जिंतूरमध्ये ३८०० रुपये, हिंगोलीमध्ये ३९१२ रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३९५० रुपये, लासलगावमध्ये ४१७६ रुपये, उदगीरमध्ये ४११५ रुपये, जालना बाजारात ४०५० रुपये आणि उमरेडमध्ये ४२५० रुपये सरासरी दर मिळाला.

Leave a Reply