Unseasonal rain : मात्र, पारा सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक असून, पारा घटला तरी उन्हाचा तडाखा कायम होता. विदर्भात चंद्रपूरला सर्वाधिक ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती येथील तापमानही ४१ अंशांच्या वर होते. दिवसाचा पारा घटला तरी रात्रीच्या तापमानात अंशतः वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नागपूरला २२.८ अंश किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक किमान तापमान वर्धा २४.४ अंश, अमरावती २४.१ अंश आणि इतर जिल्ह्यांत रात्रीचा पारा २३ अंशांवर होता.
मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव. ढगाळ हवामानामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे. आज (ता. ३१) कोकण पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उद्यापासून (ता. १) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर.
विजांसह पावसाचा अंदाज :
मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव.












