Market price of onion : आज दि. 9 एप्रिल रोजी दुपारपर्यंत महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची एकूण आवक 2,07,939 क्विंटल इतकी होती. याच दिवशी लाल कांद्याची आवक 50,505 क्विंटल नोंदवली गेली. उन्हाळी कांद्याला सरासरी म्हणजेच सर्वसाधारण दर 1250 रुपया प्रति क्विंटल मिळाला, तर लाल कांद्याला सर्वसाधारण दर 1150 रुपया प्रति क्विंटल होता.
आज सर्वाधिक उन्हाळी कांद्याची आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत झाली. येथे 19,800 क्विंटल कांदा आला. दुसऱ्या क्रमांकावर लासलगाव बाजार होता, जिथे 15,966 क्विंटल आवक नोंदली गेली. सर्वाधिक सरासरी दर मिळवणारा बाजार दिंडोरी-वणी ठरला. येथे उन्हाळी कांद्याला सरासरी 1410 रुपये दर प्रति क्विंटलसाठी मिळाला.
लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये दोन दिवसांत दरात काहीसा बदल दिसून आला. लासलगावमध्ये काल 8 एप्रिल रोजी उन्हाळी कांद्याचा सरासरी दर 1300 रुपये होता, तर 9 एप्रिलला तो 1301 रुपये झाला. पिंपळगाव बसवंतमध्ये मात्र 8 एप्रिलला उन्हाळी कांद्याला 1300 रुपये दर होता, तर 9 एप्रिलला तो 1350 रुपये झाला – म्हणजे 50 रुपयांची वाढ नोंदवली गेली.
*राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दि. 9 एप्रिल रोजी नोंदवलेले दर पुढीलप्रमाणे होते:*
– लासलगाव: उन्हाळी कांदा – 1301 रुपया, लाल कांदा – 1030 रुपया
– पिंपळगाव बसवंत: उन्हाळी – 1350, लाल – 1050
– पुणे: लाल कांदा – 1200
– सोलापूर: लाल – 1000
– छत्रपती संभाजीनगर: लाल – 950
– नागपूर: लाल – 1450
– सांगली: लाल – 1000
– अहिल्यानगर (कर्जत): लाल – 1000
दरम्यान 8 एप्रिल रोजी लासलगावमध्ये लाल कांद्याचा दर 1100 रुपया होता, तर 9 एप्रिलला तो 1030 रुपया झाला – म्हणजे दरात घट झाली. पिंपळगाव बसवंतमध्ये लाल कांद्याचा दर 8 एप्रिलला 1050 रुपया होता आणि 9 एप्रिललाही तो तितकाच राहिला. नागपूरमध्ये लाल कांद्याचा दर दोन्ही दिवशी 1450 रुपयांवर स्थिर होता.












