
KAnda bajarbhav : रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण २४,२५१ क्विंटल कांद्याची नोंद झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक २०,२३६ क्विंटल इतकी होती, तर लाल कांद्याची आवक ४,०१५ क्विंटल नोंदवली गेली. उन्हाळी कांद्याला या दिवशी सरासरी ११०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. दुसरीकडे, लाल कांद्याचा सरासरी दर ९०० रुपये इतका होता. आवक घटूनही दर घटलेले दिसून आले.
दरम्यान रविवारी राज्यात कांद्याच्या सर्वाधिक आवकेची नोंद पुणे बाजार समितीत झाली. येथे १२,३३६ क्विंटल कांदा आवक झाली. या बाजारात कांद्याला सरासरी ११०० रुपये दर मिळाला. दराच्या बाबतीत पाहता सर्वाधिक सरासरी दर रामटेक बाजारात मिळाला. येथे उन्हाळी कांद्याला तब्बल १४०० रुपये प्रती क्विंटल इतका सरासरी दर मिळाला. अन्य ठिकाणी राहता बाजारात ११५० रुपये, विजापूर-इचलकरंजीत १२०० रुपये, तर कोपरगावमध्ये ११९० रुपये असा दर नोंदवला गेला.
राज्यातील महत्त्वाच्या बाजारातील दर पुढीलप्रमाणे:
पुणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याला सरासरी ११०० रुपये, तर लाल कांद्याला ११०० रुपये दर मिळाला. राहुरीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक ४,६२४ क्विंटल होती आणि त्याला ७२५ रुपये इतका सरासरी दर मिळाला. सातारा बाजारात ५५६ क्विंटल कांद्याची आवक झाली आणि दर १००० रुपये होता. आळेफाटा (जुन्नर) बाजारात २,०४४ क्विंटल आवक झाली असून ११०० रुपये दर नोंदला गेला.
धाराशिवमध्ये लाल कांद्याला १,४०० रुपये, तर पाथर्डी येथे ७०० रुपये असा सरासरी दर मिळाला. इतर बाजारांमध्ये नागपूर, सोलापूर, कोल्हापूर या भागांतील बाजार समित्यांमध्ये या दिवशी कांद्याची नोंद नव्हती, तर लासलगाव व पिंपळगाव बसवंत बाजार समित्या रविवारी बंद असल्याने तेथे कांद्याची नोंद नव्हती.