kanda bajarbhav : आज दिनांक २९ एप्रिल रोजी पुण्यात सकाळच्या सत्रात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कराड बाजारात हलवा कांद्याला १२५० प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दरम्यान काल दिनांक २८ एप्रिल रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळी आणि लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. एकूण २ लाख ७२ हजार क्विंटल उन्हाळी कांदा आणि २७ हजार ७४३ क्विंटल लाल कांदा राज्यातील बाजारपेठांमध्ये उतरला. या दिवसात उन्हाळी कांद्याला सरासरी १०५० रुपया तर लाल कांद्याला ७०० रुपया इतका सरासरी दर मिळाला.
याच दिवशी राज्यातील पिंपळगाव बसवंत बाजारात सर्वाधिक कांद्याची आवक नोंदवली गेली. येथे तब्बल ४० हजार २२९ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. विशेष म्हणजे, पिंपळगाव बसवंत बाजारातच उन्हाळी कांद्याला सर्वाधिक सरासरी १२५० रुपया इतका दर मिळाला. नाशिक, लासलगाव, राहुरी, संगमनेर, देवळा, उमराणे, मनमाड या बाजारांमध्येही कांद्याची लक्षणीय आवक झाली असून दर सरासरी ७०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान होते.
पुणे, पिंपरी, मोशी या बाजारात उन्हाळी कांद्याला ९०० ते १२०० रुपया दर मिळाला. लाल कांद्याच्या बाबतीत पाहता, पुणे बाजारात सरासरी १००० रुपया दर होता तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला केवळ ७०० रुपया सरासरी दर मिळाला.
लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी १२०० रुपया दर मिळाला. नाशिक बाजारात ९५० रुपया सरासरी दर तर राहुरी बाजारात ७५० रुपया दर होता. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या रामटेक बाजारातही कांद्याला चांगले दर मिळाले. रामटेकमध्ये तर सरासरी १४०० रुपया दर नोंदवला गेला.
राज्यात उन्हाळी कांद्याची आवक वाढत असतानाच काही बाजारांमध्ये दर चांगले मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र लाल कांद्याच्या बाबतीत दर घसरलेले दिसत असून यामुळे काही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्य कृषी पणन मंडळाच्या अहवालानुसार, आवक वाढल्याने बाजारभावात चढउतार होत असून शेतकऱ्यांनी बाजारातील स्थितीचा आढावा घेऊनच कांदा विक्रीचे नियोजन करावे, असा सल्ला दिला जात आहे. कांद्याच्या बाजारभावात पुढील काही दिवसात आणखी काय बदल होतो, याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.












