Tomato rate : या आठवड्यात टोमॅटोचे भावात थोडीशी वाढ; पुण्याचे ताजे बाजारभाव किती..

Tomato Rate : आज मंगळवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात पुणे बाजारात टोमॅटोला सरासरी ८५० रुपयांचा दर मिळाला. दरम्यान मागच्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात काहीशी वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या प्रकल्प विभागाच्या अहवालावरून समजते. देश पातळीवर २५ टक्के आणि राज्य पातळीवर २७ टक्के आवक वाढूनही मागच्या आठड्यातील टोमॅटोचे बाजारभाव सरासरी ८८५ रुपये प्रति क्विंटल असे होते. त्यातून २ टक्के भाव वाढले असल्याचे दिसून येते.

दरम्यान आज खेड-चाकण बाजारात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव टोमॅटोला मिळाला, तर पाटण मध्ये १३५० रुपये इतका सरासरी बाजारभाव मिळाला.

दरम्यान काल दिनांक २८ एप्रिल रोजी राज्यभरातील प्रमुख बाजारसमित्यांतील टोमॅटोला सरासरी ८१३ रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला. या घाऊक दरात पाटण बाजारसमितीत टोमॅटोला सर्वाधिक १५५० रूपयांचा सरासरी भाव नोंदला गेला.

त्याचप्रमाणे, २७ एप्रिल रोजी टोमॅटोला सरासरी सुमारे ७७२ रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. या आकडेवारीत पुणे–मांजरी मधील हायब्रिड टोमॅटोचा भाव आणि नाशिक तसेच कल्याण येथील हायब्रिड टोमॅटोचे दर यांचा समावेश होता. दरम्यान त्या तुलनेत काल २८ एप्रिलला सरासरी भावामध्ये ४१ रूपयांनी वाढ झाली आहे, जी बाजारात वाढत्या मागणीचे आणि मर्यादित पुरवठ्याचे प्रतिबिंब आहे.

दिनांक २८ एप्रिल रोजी टोमॅटोची सर्वाधिक आवक संगमनेर बाजारसमितीत १५५० क्विंटल इतकी नोंदली गेली, ज्याला सरासरी ७७५ रूपयांचा भाव मिळाला. या बाजारात मोठ्या प्रमाणावर माल उतरल्याने दर किंचित कमी राहिले तरीही, स्थानिक मागणी मजबूत होती. दिनांक २७ एप्रिल रोजी पुणे–मांजरी मध्ये हायब्रिड टोमॅटोला सरासरी १००० रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला, तर नाशिकमध्ये हायब्रिड टोमॅटोचे भाव ८५० रूपये आणि कल्याणमध्ये हायब्रिड टोमॅटोला १२५० रूपये इतका सरासरी दर नोंदला गेला.04:54 PM