Cotton seeds : कापसाच्या बियाण्यांची विक्री किंमत निश्चित, या तारखेपासून होणार विक्रीला सुरुवात ..

Cotton seeds : खरीप हंगाम २०२५-२६ साठी कापसाच्या बियाण्यांच्या विक्री किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. भारत सरकारने यासाठी राजपत्र प्रसिद्ध केले आहे.

किमतीचे तपशील
🔰 बीजी-१ बियाणे (४७५ ग्रॅम): ६३५ रुपये प्रति पाकिट

🔰 बीजी-२ बियाणे (४७५ ग्रॅम): ९०१ रुपये प्रति पाकिट

🔰 गतवर्षीच्या तुलनेत बीजी-२ बियाण्याच्या किंमतीत ३७ रुपयांची वाढ झाली आहे.

कापसाचे क्षेत्र आणि लागवड
खरीप हंगामा महिनाभरात सुरू होत आहे. राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते आणि त्याचे क्षेत्र वाढत आहे. कृषी विभागाने यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज धरून नियोजन केले आहे. शेतकरी मुख्यतः बीजी-२ बियाण्यांची लागवड करण्याला प्राधान्य देत आहेत.

शेतकऱ्यांसाठी सूचना
🔰 कापसाची लागवड सुरू होताच काही वाणांची मागणी वाढते. त्यामुळे विक्रेत्यांकडून अधिक दराने विक्री केली जाण्याची शक्यता असते. तसेच, बनावट बियाण्यांची विक्रीही होऊ शकते. शेतकऱ्यांनी खालील सूचना पाळाव्या:

🔰 शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक दर देऊ नयेत.

🔰 अधिकृत निविष्ठा विक्री दुकानातूनच खरेदी करावी.

🔰 पक्की पावती घ्यावी.

ऑनलाइन आणि दारावर खरेदी टाळा..
कापसाचा हंगाम सुरू झाल्यावर काही लोक थेट शेतकऱ्यांच्या दारावर येऊन बियाण्यांची विक्री करतात. तसेच, बाजार दरापेक्षा कमी दराने विक्री केली जाते. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या व्यवहारांपासून सावध राहावे आणि अधिकृत मार्गानेच खरेदी करावी.

या सर्व सूचनांचा अनुसर करून शेतकऱ्यांनी सुरक्षित आणि फायदेशीर कापूस लागवड करावी.