
Kanda Bajarbhav : अवकाळी पावसानंतर राज्यात कांदा आवक वाढत होती, मात्र या आठड्यापासून ती कमी होताना दिसत आहे. काल दिनांक ४ जून २०२५ रोजी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त २०२० रुपया दर मिळाला, तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक २५३० रुपया इतका दर मिळाला. हे दोन्ही दर राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत सर्वाधिक होते.
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामध्ये राज्यभरात एकूण सुमारे १ लाख क्विंटलच्या आसपास उन्हाळी कांद्याची आवक झाली असून, त्याला सरासरी दर १००० ते १५०० रुपया इतका मिळाला. याशिवाय सुमारे ४२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक नोंदवली गेली, ज्याला सरासरी दर ९०० ते १६०० रुपया दरम्यान मिळाला.
या दिवशी राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत २१८६६ क्विंटल झाली होती. या बाजारातच कांद्याला सरासरी सर्वसाधारण दर १५०० रुपया मिळाला. मालेगाव-मुगंसे (१०००० क्विंटल), सटाणा (९१३५ क्विंटल), लासलगाव (१५६४७ क्विंटल), चांदवड (४२०० क्विंटल) आणि सगंमनेर (७६२९ क्विंटल) बाजारातही मोठी आवक झाली.
राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांतील सरासरी दर खालीलप्रमाणे होते :
लासलगाव : उन्हाळी कांदा १४२० रुपया
पिंपळगाव बसवंत : उन्हाळी कांदा १५०० रुपया
नाशिक जिल्हा (सटाणा) : उन्हाळी कांदा १२१० रुपया, चांदवड १३५० रुपया
पुणे : उन्हाळी कांदा १००० रुपया, खडकवासला उपबाजारात १३०० रुपया
सोलापूर : लाल कांदा १००० रुपया
राहुरी : लाल कांदा ८५० रुपया
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी कांदा ७०० रुपया
नागपूर : उन्हाळी कांदा १४०० रुपया, लाल कांदा १६०० रुपया
सांगली : उन्हाळी कांदा ९५० रुपया
कोल्हापूर : कांदा १२०० रुपया
अहिल्यानगर (कजत, अहमदनगर) : उन्हाळी कांदा ८०० रुपया
राज्यात कांद्याची दररोज मोठ्या प्रमाणावर आवक होत असून बाजारनिहाय दरात स्पष्ट फरक आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजारांमध्ये दरात थोडी वाढ दिसली असून, काही ठिकाणी दर स्थिर आहेत. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर कांद्याचा साठा, मागणी आणि वाहतुकीची स्थिती पाहता दरामध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.