Heavy rain : राज्यातील ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ₹४८० कोटींची मदत मंजूर..


Heavy rain : अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यांसाठी ४८० कोटी ३७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे.राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.

मदत मिळणारे जिल्हे व रक्कम:

विभाग जिल्हा मंजूर मदत रक्कम
अमरावती विभाग अकोला ₹९१.१२ कोटी
  बुलढाणा ₹२८९.२७ कोटी
  वाशीम ₹३४.६४ कोटी
छत्रपती संभाजीनगर विभाग जालना ₹०.८३ कोटी
  हिंगोली ₹६४.६१ कोटी
  एकूण ₹४८०.५० कोटी
 

👨‍🌾 लाभार्थी व क्षेत्रफळ:

  • शेतकरी लाभार्थी: ६,७२,८६६

  • नुकसानग्रस्त क्षेत्रफळ: ५,३७,३७८ हेक्टर

📋 मदतीचे निकष:

  • पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत.

  • एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ३ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठीच मदत.

  • ◼️ वरील जिल्ह्यांतील ५ लाख ३७ हजार ३७८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी ६ लाख ७२ हजार ८६६ शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.
    ◼️ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येत आहे.