Grape Harvest : द्राक्ष काढणी हंगामाची सुरुवात; सुपर सोनाका द्राक्षांना चांगला दर…



Grape HArvest : खानापूर घाटमाथ्यावर देशांतर्गत निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या द्राक्ष काढणीच्या हंगामाला सुरुवात झाली असून सुपर सोनाका जातीच्या द्राक्षांना सध्या चार किलोस ४५० ते ४७० रुपये दर मिळत आहे. पळशी व हिवरे परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाण मोठे असून येथील शेतकरी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक दिवस बागांमध्ये पाणी साचून राहिल्याने काही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये घड न येता संपूर्ण हंगाम वाया गेला आहे, त्यामुळे उत्पादन व उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.

मात्र काही शेतकऱ्यांनी खराब वातावरण असतानाही धाडसाने आगाप छाटणी घेऊन प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बागा यशस्वीपणे जोपासल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणाऱ्या द्राक्षांच्या काढणी हंगामास अद्याप सुरुवात झालेली नसली तरी हिवरे परिसरात सध्या देशांतर्गत बाजारासाठी द्राक्ष काढणी सुरू असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. या भागात अजूनही थंडीचे प्रमाण जाणवत असले, तरी सध्याच्या चांगल्या भावामुळे पुढील काळात द्राक्षांच्या दरात आणखी वाढ होईल अशी आशा द्राक्ष बागायतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये दर्जेदार द्राक्ष घड तयार झाले आहेत, त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

खराब हवामान असूनही काही शेतकऱ्यांनी आगाप छाटणी करून द्राक्ष बागा यशस्वीपणे जोपासल्या आहेत. हिवरे परिसरात सध्या देशांतर्गत बाजारासाठी द्राक्ष काढणी सुरू असून चांगला दर मिळत आहे. थंडी कायम असली तरी दर वाढण्याची शक्यता असल्याने द्राक्ष बागायतदारांना यंदा चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/01/2026
पुणे-मोशी लोकल क्विंटल 13 10000 10000 10000
23/01/2026
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 507 10000 14000 12000
सोलापूर लोकल नग 52 120 160 140
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 19 3000 7000 5000
पुणे लोकल क्विंटल 290 4000 16000 10000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 8 10000 10000 10000