बाजारात सध्या जांभळे दिसू लागलेले आहेत. जांभळाची विक्री किलोमागे सहाशे ते सातशे रुपये दराने केली जात आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळाच्या फळांची आवक वाढल्यानंतर जांभळाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
पालघरमधील वैतरणा नदीजवळील बहडोली गावातील टपोरी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत. याठिकाणची जांभळे खूप प्रसिद्ध आहेत.बहाडोली गावातील शेतकरी त्यांच्या शेताच्या बांधावर लावलेली जांभळाच्या झाडाला येणारी फळे काढून विकतात .आता तेथील शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अधिकाधिक झाडे लावण्यासाठी आणि फळे अधिक चांगली येण्यासाठी ते खरोखर कठोर परिश्रम करत आहेत.बहडोली गावात जांभळाची 6000 झाडे आहेत. तर आता नव्याने दोन हजार झाडांची लागवड करण्यात येत आहे .एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यंदाचा हंगाम सुरू झाल्यामुळे आता शेतकऱ्याना एक ते दीड महिन्यांचा हंगाम मिळणार आहे .त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.
वय झालेल्या व उंची वाढलेल्या झाडांची छाटणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.नवीन लागवड झालेल्या झाडांच्या उंचीत होणारी वाढ थांबवणासाठी (रोखण्यासाठी) छाटणी करून झाडाचा विस्तार जमिनीला समांतर करून फळ तोडणी सोपी होईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.