आपल्या शेतकऱ्यांसाठी खजूर शेती जास्त उत्पन्न देणारी, व खूप फायद्याची ठरू शकते . जॅम, ज्यूस, लोणचे व बेकरी अशा अनेक ठिकाणी खजूर वापरली जाते . शेतकऱ्यांना खजूर शेतीची लागवड करायची असल्यास एवढा खर्च येत नाही . खजुराच्या एका झाडापासून पन्नास हजार रुपयांची कमाई करू शकतो .या शेतीचे योग्य नियोजन करून भविष्यात लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.
पाण्याचा योग्य निचरा होणारी आणि वालुकामय जमीन खजूर शेतीच्या लागवडीसाठी आवश्यक असते . 30 अंश तापमानात या फळांची वाढ चांगली होते.परंतु ३० अंशपेक्षा तापमान जास्त असू नये .तसेच हे फळ पक्व होण्यासाठी मात्र 45 अंशा पर्यंत तापमान असणे आवश्यक असते .
या फळाची चांगली वाढ होण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश लागतो. कुळवाच्या पाळ्या घालून माती भुसभुशीत करून घ्यावी . म्हणजे जमीन समतल करून घ्यावी. त्यामुळे जमिनीत पाणी तुंबणार नाही . पाण्याची निचऱ्या योग्य प्रकारे होईल,व झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होईल.
शेतात एक मीटर अंतरावर खड्डे खजुराच्या रोपांची लागवड करण्यासाठी तयार करावे. 25 ते 30 किलो शेण मातीसह खड्ड्यांमध्ये टाकावे. खजुराची रोपे आणताना सरकारी नोंदणी असलेल्या कोणत्याही रोपवाटिकेतून विकत आणावीत नंतर त्यांची लागवड करावी.
खजुराची लागवड ही ऑगस्ट महिना मध्ये केली जाते . १ एकरात जवळ – जवळ सत्तर खजुराची रोपे लावली जातात . लागवड केल्यानंतर ३ वर्षांनी आपण उत्पादन घेण्यास सुरु करू शकतो . आजकाल शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेण्याची पद्धत बंद करून आधुनिक पिके घेण्यास सुरुवात केली आहे . भाजीपाला , वेगवेगळ्या प्रकारची फळे, या प्रकारचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत.