कृषी विभागाच्या निष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली . छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये हंगामासाठी लागणारे खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व त्याचे वाटप व विक्री योग्य पद्धतीने व्हावी यासाठी कृषी विभाग तसेच वितरण व संबंधित यंत्रणेने व्यवस्थित लक्ष द्यावे व नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तित कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.
तसेच कृषी विभागाच्या निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली असून यावेळी वर्षभरासाठी लागणारे बियाणे व खते यांचे नियोजन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय समितीने सादर केले त्यामुळे खते व बियाणे याबाबत शेतकऱ्यांची काळजी मिटलेली आहे.
यंदाच्या वर्षी कापूस , सोयाबीन इतर तृणधान्य पिकाच्या बियाणांचा साठा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे . दुबार पेरणीची आवश्यकता पडली तरी पण बियाण्यांची कमतरता होणार नाही. तसेच पाण्डेय यांनी शेतकऱ्यांनी देशी बियाण्याच्या वापरावर भर द्यावा असे सांगितले तसेच प्रत्यक्ष मागणीनुसार खतांची विक्री ऑनलाइन पद्धतीने होते की नाही याबाबत खातर जमा करावी. शेतकऱ्यांना नॅनो युरिया वापरण्याबाबत चे प्रात्यक्षिके करून दाखवावीत . बोगस बियाण्याची विक्री रोखण्यासाठी दुकानांची तपासणी करावी. असे निर्देश पाण्डेय यांनी दिले आहेत.
पिक विमा देण्याबाबतच्या त्रुटीची पूर्तता करण्याची निर्देश.
आता शेतकऱ्यांना तालुक्यानुसार बियाणांविषयी तक्रार निवारण कक्षातून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे . शेतकऱ्यांना पिकांवर कीटकनाशके फवारणी करण्याच्या वेळेस काय सुरक्षा घ्यावी यासाठी उपाय योजना काय कराव्यात याबाबत मार्गदर्शन करावे. डीएपी , युरिया या खतांचा साठा वाढविण्या बाबत तसेच पिक विमा पासून जे वंचित शेतकरी आहेत त्यांना पिक विमा देण्याबाबत त्यांच्या त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश पाण्डेय यांनी यावेळी दिले तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव हे प्रलंबित न ठेवता शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून द्यावा असे देखील यावेळी त्यांनी सूचित केले.
यावेळी कृषि अधिकारी प्रकाश देशमुख, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी जगन्नाथ तायडे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी, इ . या बैठकीस उपस्थित होते.