शेतकऱ्यांना दरवर्षी पंतप्रधान मंत्री कृषी सन्मान निधीतून सहा हजार रुपये मिळत होते . तसेच आता राज्य सरकारकडून देखील सहा हजार रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधीतून मिळणार आहे . अशी मंजुरी मंत्रिमंडळाने मंगळवारी दिली आहे.
या योजनेचा १. १५ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आर्थिक वर्षात राज्य सरकारला या योजनेपोटी सहा हजार नऊशे कोटी रुपये खर्च येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची गेल्या अर्थसंकल्पनात घोषणा केली होती.
यानुसार एप्रिल ते जुलै मध्ये पहिला हप्ता तर ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये दुसरा हप्ता तसेच डिसेंबर ते मार्चमध्ये तिसरा हप्ता जमा होईल, या योजनेमध्ये पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.या योजनेच्या सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय ,तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील स्थापन करण्यात आलेले आहे.