केळी म्हणलं की जळगावची आठवण होते. आजच्या घडीला रासायनिक खतांचा जास्त वापरामुळे केळीचे उत्पादन व जमिनीची सुपीकता घटत चाललेली आहे . हेच लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःची नर्सरी तयार करून त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने केळीची रोपे तयार केले असून त्यांनी केलेला हा प्रयोग चर्चेची बाब या जिल्ह्यात ठरलेले आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र आताच्या काळामध्ये केळीची रोपे लागवड करण्यासाठी टिशू कल्चरच्या रोपाच्या किमती खूप वाढल्या आहेत . तसेच रासायनिक खतांच्या देखील किमती खूप वाढलेले आहेत . त्यामुळे उत्पादन खर्च जास्त होत असल्यामुळे या शेतकऱ्याने एक नवीन प्रयोग शोधून काढला. अंशुमन पाटील हे शहादा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे राहणारे आहेत. त्यांनी आपल्या शेतामध्ये नर्सरी तयार करून त्यात सेंद्रिय पध्दतीने केळीची रोपे तयार केली .
गेल्या बारा वर्षांपासून अंशुमन पाटील हे केळीचे उत्पादन घेत आहे. पहिल्यांदा ते लागवडीसाठी बाहेरून रोप आणत असत त्या रूपामध्ये मर चे प्रमाण जास्त असते तसेच रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे त्यांच्या उत्पादन घट होत असत यावर त्यांनी मार्ग म्हणून आपल्या शेतामध्ये नर्सरी तयार करून त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने केळीची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. ते रेसिड्यू फ्री उत्पादन घेत आहेत. टिशू कल्चर पेक्षा सेंद्रिय पद्धतीने रोप तयार करण्यासाठी लागणारा खर्च हा कमी येतो टिशू कल्चर मध्ये रोप पंधरा रुपये पर्यंत असते. तसेच सेंद्रिय रोप हे नऊ रुपयात तयार होते . यामध्ये देखील पैशाची बचत होते.
दिल्ली प्रयोगशाळेत तपासणी
अंशुमन पाटील हे गेल्या दहा वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने केळीचे उत्पादन घेत असून ते खत म्हणून हिरवळीच्या खताचा वापर करत असतात. यांच्या शेतामध्ये गांडूळ खताची निर्मिती देखील केली जात असते. सेंद्रिय पद्धतीने केळीचे उत्पादन घेतल्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर केळीची मागणी वाढलेली आहे . त्यांनी दिल्लीच्या खाजगी प्रयोग शाळेत तपासणी केली असून त्यामध्ये कोणताही रासायनिक घटक आढळून आलेला नाही.
रासायनिक मुक्त शेती ही चळवळ
अलीकडच्या काळामध्ये रासायनिक खताच्या जास्त वापरामुळे केळीचे उत्पादन कमी झालेले आहे. यावर मार्ग काढतच अंशुमन पाटील हे सेंद्रिय शेतीकडे वळवलेले आहे . दिल्लीमध्ये झालेल्या तपासणीत पिकवलेल्या केळीला रासायनिक घटक मुक्त पदार्थाचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे विदेशात देखील त्यांचा केळीची मागणी वाढलेली आहे त्यांच्या परिसरातील अनेक शेतकरी आता रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत.