तूर आणि उडीद डाळी बद्धल मोठी बातमी आहे, केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठेबाजीस मर्यादा घातली आहे.
केंद्र सरकारने तूर आणि उडीद या डाळींवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठेबाजीची करण्यास मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती ग्राहक आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली.
याचा अर्थ घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, रिटेलर आणि आयातदार ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त डाळी आपल्याकडे साठवून ठेवू शकत नाहीत.
तूर आणि उडीद च्या एकदम वाढलेल्या भावामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरवातीपासूनच ह्या दोन्ही डाळीचे दर वाढीव राहिलेले आहेत.