कापसावर होणाऱ्या घातक गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करा ‘या’ उपाययोजना.

कापसावर होणाऱ्या घातक गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करा 'या' उपाययोजना

कापूस उत्पादक अनेक वर्षापासून गुलाबी बोंड अळीमुळे चिंतेत आहेत. कापूस उत्पादनात या गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात घट होते.. कापसाची उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून लागवड करण्यात येत असते. ही लागवड दोन पद्धतीने केली जाते . ती म्हणजे एक बागायतीत आणि कोरडवाहू जमिनीमध्ये .

बागायतीत लागवड ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते . तर कोरडवाहू जमिनीतील कापसाची लागवड ही पावसावर अवलंबून असते . वाढते तापमान आणि मागील वर्षी झालेल्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव या दोन्हीही गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करताना काळजी घेण महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी कापूस लागवडी पूर्वी आपली जमीन खोल नांगरणी करून घेतली पाहिजे. त्यामुळे किडीचे कोष नष्ट होण्यास मदत होते . जमीन जर बागायती असेल तर सरी पद्धतीने कापसाची लागवड करावी.

लागवड करत असताना तापमान वाढ झाल्याने पाणीपातळी कमी झाली असेल, तर बागायती शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड करावी. जमीन कोरडवाहू असेल तर 50 % पेक्षा जास्त पाऊसझाल्यावर लागवडीला सुरुवात करावी . गुलाबी बोंड आळी मुळे कापूस उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट होत असते . या गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये देखील होताना दिसत आहे.

कापसाची लागवड करताना घेण्याची काळजी

यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मागील हंगामामध्ये ज्या क्षेत्रावर कापसाची लागवड केलेली आहे त्या क्षेत्रा वर कापसाची लागवड करू नये बोंड आळी वर नियंत्रण करण्यासाठी कमी दिवसात येणारे कापसाच्या वाणाची निवड करावी. नॉनव्हिटी रिफ्यूजी शेताच्या आजूबाजूला लागवड करावी.

कोणत्या गोष्टींमुळे बोंड अळी चे नियंत्रण करता येणार आहे.

▪️ कापसाच्या लागवडीच्या आधी शेतीची खोलवर मशागत करून घ्यावी त्यामुळे आळ्यांची कोश नष्ट होतात.

▪️ तापमान जर जास्त असेल तर बागायती जमिनीतील कापसाची लागवड ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न करता जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी.

▪️मागच्या हंगामामध्ये ज्या ठिकाणी कापसाची लागवड करण्यात आलेली आहे ,त्या ठिकाणी कापसाची लागवड न करता दुसऱ्या ठिकाणी कापसाची लागवड करावी.

▪️ शेतकऱ्यांना शक्य असल्यास कमी कालावधीमध्ये उत्पन्न देणाऱ्या वाणाचीच निवड करावी,त्यामुळे अळी वर नियंत्रण करता येऊ शकते.

▪️ कापसाचे अधिकृत बीटी बियाणे वापरावे त्यासोबत आलेले नॉन बीटी बियाणे बांधाच्या आजूबाजूस लावावीत.

▪️शक्यतो त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी कापसाची लागवड एकाच दिवशी करावी.

▪️ योग्य नियोजन केल्यास तसेच लहान-मोठ्या गोष्टींचा विचार केल्यास बोंड अळीचा आणि इतर बाबींपासून शेतकऱ्यांना नक्कीच सुटकारा मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *