शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पावसाची प्रतीक्षा आहे .पाऊस अवघ्या काही दिवसांमध्ये पडेल अशा आशेने शेतकरी बी बियाणे खरेदीला सुरुवात करत आहे. मात्र बी बियाणी खरेदी करत असताना एकाच वाणामागे सर्व शेतकऱ्यांनी लागू नये.
एकाच प्रकारचे वाण सर्व शेतकऱ्यांना मिळू शकत नाही .त्यामुळे विविध वाणांच्या प्रयोगाला प्राधान्य शेतकऱ्यांनी दिले पाहिजे ,असे कृषी तज्ञ यांनी आव्हान केले आहे. कारण ठराविकच वाण मागणी जास्त वाढली तर त्यामध्ये काळाबाजार होण्याची भीती जास्त असते. यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा इशारा देखील कृषी केंद्र चालक यांनी केलेला आहे.
नाशिकच्या मालेगाव सह जिल्ह्याभरात शेतकरी हवाईदिल.
पावसाचा मृग नक्षत्र कोरडाच गेल्यामुळे नाशिकच्या मालगाव सह जिल्ह्याभरात शेतकरी हवाई दिल झाले आहेत .पाऊस वेळेवर पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वक शेतीचे कामे पूर्ण केली होती. तसेच खते बियाणे खरेदी करून ठेवली होती. मात्र पावसाने खंड केल्यामुळे बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. पावसाच्या न पडल्यामुळे खरीप हंगामाचे पूर्ण नियोजन बिनसले आहेत तसेच पाऊस लांबल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे .त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.
चिंतेने शेतकरी वर्ग हतबल
पाऊस लांबल्यामुळे सर्व शेतकरी वर्ग हातबल झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी आपल्या परीने कपाशीची लागवड करून आपल्या सोयीने सिंचन द्वारे पाणी दिले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांची मात्र कपाशीची लागवड अजूनही झाली नाही. पाऊस केव्हा पडणार या चिंतेने सर्व शेतकरी हतबल झालेले आहेत.